Nitesh Rane : उद्धव ठाकरेसारखा खोटारडा जगाच्या पाठीवर कुठेही सापडणार नाही!

भाजपा आमदार नितेश राणे यांचा घणाघात


मुंबई : लोकसभा निवडणुकीमुळे (Loksabha Elections) राजकीय नेत्यांनी सभांचा धडाका लावला आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. त्यातच ठाकरे गटाचे (Thackeray Group) प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र पडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरुन भाजपा नेते संतापले आहेत. भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी उद्धव ठाकरेंना खडे बोल सुनावले आहेत. 'उद्धव ठाकरेंसारखा खोटारडा माणूस जगाच्या पाठीवर कुठेही सापडणार नाही!', असा घणाघात नितेश राणे यांनी केला.


नितेश राणे म्हणाले, आज उद्धव ठाकरे याने स्वतः मी किती खोटारडा आहे याचा पुरावा महाराष्ट्रासमोर दिला. त्याचबरोबर हे स्पष्ट करुन टाकलं आहे की २०१९ ला आदरणीय देवेंद्र फडणवीसजींनाच मुख्यमंत्री करायचं ठरलं होतं. उद्धव ठाकरे म्हणाले की देवेंद्रजींनी त्यांना 'मी आदित्यला मुख्यमंत्री बनायचं ट्रेनिंग देतो आणि मग राष्ट्रीय राजकारणात जातो', असं सांगितलं होतं. उद्धव ठाकरे किती मोठा खोटारडा आहे हे त्यांच्या भावाला म्हणजे जयदेव ठाकरेंना जाऊन विचारा. जो माणूस बाळासाहेबांची प्रॉपर्टी हडपण्यासाठी स्वतःच्या भावाशी खरं बोलत नाही, ज्याला रक्ताची नाती सांभाळता आली नाहीत, त्याला असं वाटतंय की महाराष्ट्राच्या जनतेने त्याच्यावर विश्वास ठेवावा? असा परखड सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला.


उद्धव ठाकरेसारखा खोटारडा माणूस जगाच्या पाठीवर कुठेही सापडणार नाही. देवेंद्रजी असं वक्तव्य करतील, हे लहान मुलालाही खरं वाटणार नाही. ज्या आदित्यला तुम्ही मुख्यमंत्री बनवायचं म्हणताय, त्याचं अजून लग्नही ठरत नाही. त्याला साधं आपल्या कंपनीत कोणी कारकून म्हणूनही ठेवणार नाही, त्याने आमदारकीच्या काळात आपल्या मतदारसंघात पाच लोकांनाही उभं केलं नाही, त्याला शाखाप्रमुखही बोलता येत नाही, त्याला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनवणार होते. याचा अर्थ एवढाच होतो की आता मानेच्या औषधाचा परिणाम उद्धव ठाकरेंच्या डोक्यापर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे अशा पद्धतीची वायफळ बडबड हा उद्धव ठाकरे नावाचा वेडा करतो आहे, अशी टीका नितेश राणे यांनी केली.



नितेश राणे यांची इंडियन एक्स्प्रेसकडे मागणी


नितेश राणे यांनी इंडियन एक्स्प्रेसकडे एक मागणी केली. ते म्हणाले की, उद्धव ठाकरेच्या अशा मुलाखती देण्यापेक्षा इंडियन एक्स्प्रेसने जयदेव ठाकरे यांनी कोर्टात जी स्टेटमेंट्स दिली आहेत, ती फ्रंट पेजवर छापावीत. ठाकरे कुटुंबातील सदस्य उद्धव ठाकरे आणि कुटुंबियांबद्दल काय बोलतात, हे एकदा इंडियन एक्स्प्रेसमध्ये छापा. ज्यामुळे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या जनतेला कळेल की हा किती नीच प्रवृत्तीचा माणूस आहे.



प्रॉपर्टीसाठी स्वतच्या वडिलांच्या मृत्यूची योग्य तारीख लपवली


उद्धव ठाकरे याने प्रॉपर्टी हडपण्यासाठी स्वतच्या वडिलांच्या मृत्यूची योग्य तारीख जाहीर केली नाही, कारण काही कागदपत्रं मागेपुढे राहिली होती. तो माणूस आमच्या देवेंद्रजींची अशी प्रतिमा लोकांसमोर आणत असेल, तर त्याच्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही, असं नितेश राणे म्हणाले.



संजय राऊत शिंदेंना सामील होणार


लोकसभा निवडणुकीनंतर शिंदेंची शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी दिसणार नाही, भाजपा मात्र ढेकर देईल, या संजय राऊतांनी केलेल्या टीकेवर नितेश राणे यांनी टीका करत मोठा खुलासा केला. ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीनंतर संजय राजाराम राऊत हा अधिकृतपणे आपल्या भावाला घेऊन एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहे. यावर ४ जूनला निश्चित शिक्कामोर्तब होईल. स्वतःची खासदारकी आणि आमदारकी वाचवण्यासाठी उद्धव ठाकरेंना कधी सोडायचं आणि कधी शिवसेनेत प्रवेस करायचा याची तारीख देखील त्याने ठरवली आहे, असं नितेश राणे म्हणाले.



उद्धव ठाकरे पाकिस्तानचे मुख्यमंत्री बनू शकतात


उद्धव ठाकरेंना पंतप्रधानपदाची संधी मिळाली तर शरद पवार त्यांना पाठिंबा देतील, या संजय राऊतांच्या वक्तव्यावर नितेश राणे म्हणाले, पाकिस्तानमध्ये पंतप्रधानपदाची खुर्ची खाली आहे, असं मी ऐकलं आहे. भारतामध्ये तर त्याची बुकिंग झाली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेला पाकिस्तानमधून पंतप्रदान करा आणि पाकिस्तानचं नाव ऐकल्यावर शरद पवार निश्चितपणे पाठिंबा देतील. त्यामुळे कधी लाहोरला जाताय ते सांगा आम्ही वाजतगाजत तुम्हाला पाठवू, असा खोचक टोला नितेश राणे यांनी लगावला.

Comments
Add Comment

जालन्यात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला

जालना : जालना शहरात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर एका पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केल्याची धक्कादायक

मतदानानंतर सुबोध भावेंची स्पष्ट भूमिका अन् पुण्यात रंगली 'ती' एकच चर्चा

पुणे: पुणे महापालिका निवडणुकीसाठी शहरात मतदानाचा उत्साह पाहायला मिळत असताना, मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता

Latur : महिन्याभरापूर्वी निवडणूक जिंकली आणि उपचारांअभावी गेली

लातूर : लातूर जिल्ह्यात मन हेलावणारी घटना घडली आहे. अहमदपूर शहरातून ही घटना समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या

Kolhapur Crime : आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मुख्याद्यापकानेच विद्यार्थिनीला फ्लॅटवर नेत...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका आश्रमशाळेशी संबंधित प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

दौंडमध्ये राजकीय कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; पोलीस ठाण्याजवळच घडले 'हे' धक्कादायक दृश्य

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात घडलेल्या एका घटनेमुळे स्थानिक कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह

पैशांच्या वादातून मित्रानेच केली मित्राची हत्या ...आरोपीला ट्रेनमध्ये पकडलं..!

पुणे/रायगड : रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाट परिसरात पैशाच्या वादातून घडलेली मित्रामधील हत्येची घटना समाजात