अमरावती : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) कायम बेताल वक्तव्ये करुन वादाच्या भोवर्यात सापडतात. आतापर्यंत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर खालच्या पातळीवर केलेल्या टीकेमुळे भाजप नेते त्यांच्यावर प्रचंड संतापलेले आहेत. त्यातच आता भाजपच्या महिला उमेदवाराविषयी अत्यंत नीच दर्जाची टीका करुन त्यांनी स्वतःहून संकट ओढावून घेतले आहे. भाजपच्या अमरावतीतील उमेदवार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्याबाबत त्यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले. यावर नवनीत राणा व त्यांचे पती रवी राणा (Ravi Rana) यांनी संजय राऊतांना खडे बोल सुनावले. यानंतर आता विधानपरिषदेच्या उपसभापती व शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनीही संजय राऊतांचा खरपूस समाचार घेतला आहे.
वाशिम (Washim) जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना नीलम गोऱ्हे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्या म्हणाल्या, काही व्यक्तींना असं वाटतं की शिवराळ भाषा वापरून आपण हिरो ठरतो. मात्र, अशा प्रकारे महिलांबद्दल वाईट बोलणारे झिरो आहेत. राऊतांवर आरोप करणाऱ्या महिलांना त्यांनी किती गलिच्छ भाषेत शिवीगाळ केली ते आम्ही ऐकलं आहे. आपल्या कुटुंबातील महिलांना चालतील तेच शब्द इतर महिलांबद्दल वापरावेत. राऊतांनी नवनीत राणांबद्दल वापरलेला शब्द पुन्हा वापरणे योग्य नाही. त्यामुळे त्यांचा अपमान होईल. म्हणून मी तो शब्द बोलत नाही. मात्र त्यांनी केलेला शब्द प्रयोग हा अतिशय चुकीचा आणि एका महिलेचा अवमान करणारा आहे, अशी टीका त्यांनी केली.
पुढे नीलमताई म्हणाल्या, एका महिलेबद्दल लोकप्रतिनिधीने अशा भाषेचा वापर करून टीका करणे हे अजिबात योग्य नाही. त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे योग्य राहील आणि याबाबत निवडणूक आयोग दखल घेऊन योग्य ती कारवाई करेल. अशा काही लोकांच्या सकाळच्या डराव- डरावमध्येही काही तथ्य नसतं. त्यामुळे त्यांना फार गांभीर्याने घेण्याची गरज नसल्याची बोचरी टीका नीलम गोऱ्हे यांनी केली.
संजय राऊत नवनीत राणा यांना उद्देशून म्हणाले होते की, ज्या बाईने मातोश्रीला आव्हान देण्याचा प्रयत्न केला, ज्या बाईने मातोश्रीत घुसण्याचा प्रयत्न केला, मातोश्रीविषयी अपशब्द वापरले, हिंदुत्वाविषयी अपशब्द वापरले, त्या बाईचा पराभव करणं शिवसैनिकांचं पहिलं कर्तव्य आणि नैतिक कर्तव्य आहे. ती नाची…डान्सर.. बबली.. तुम्हाला खुनावेल.. पडद्यावरून इशारे करेल.. पण भुरळून जाऊ नका.. अशा एका नटीने विश्वामित्रांनाही फसवले होते, अशी अत्यंत आक्षेपार्ह टीका संजय राऊतांनी केली होती.
उच्च न्यायालयाकडून कारवाईला स्थगिती मुंबई : विलेपार्ले येथील दिगंबर जैन मंदिर तोडक कारवाईप्रकरणी पालिकेचे विभाग…
स्टेटलाइन : डॉ. सुकृत खांडेकर डायरेक्टोरेट ऑफ इर्फोसमेन्ट (ईडी)ने मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली सोनिया गांधी व…
मुंबई : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्याची इच्छा असलेल्या महाराष्ट्रातील युवक-युवतींसाठी…
दक्षिण भारतीय साईभक्तांकडून सर्वाधिक मुकुट शिर्डी : ज्यांच्या चरणी श्रद्धा आणि सबुरीने नतमस्तक झाल्यावर माणसाचं…
'शिट्टी वाजली रे' ला टक्कर द्यायला आला नवीन शो मुंबई: सध्या मराठी वाहिन्यांवर नवनवीन मालिका…
मुंबई: अनेकांना आपलं आरोग्य कसं आहे, आणि आपण किती वर्ष जगणार हे जाणून घेण्यासाठी अनेकजण…