Maharashtra Weather: पुढील ७ दिवस 'या' ठिकाणी पावसाचा इशारा; मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होणार!

  187

तर मुंबईत असेल 'असं' वातावरण


मुंबई : राज्यातील अनेक भागांत तापमानात प्रचंड वाढ होताना दिसून येत आहे. एकीकडे सूर्य आग ओकत आहे तर दुसरीकडे राज्यातील काही भागात अवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आणखी काही दिवस अशीच स्थिती राहणार आहे. किनारपट्टीवरील शहरं वगळता राज्यातील अनेक भागात गडगडाटी वादळ, हलका ते मध्यम पाऊस आणि वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.



काही भागांमध्ये पावसाची शक्यता


हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, २१ आणि २२ एप्रिल रोजी कोकण गोव्यातील काही भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात हवामान कोरडे राहणार असल्याचा अंदाज आहे. आगामी पाच ते सात दिवस मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा तसेच विदर्भात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यातच विदर्भातील कमाल तापमानात पुन्हा एकदा मोठी वाढ झाली आहे.


सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, नगर, धाराशिव, लातूर, बीड, नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.



मुंबईत असे राहणार तापमान


मुंबईसह किनारपट्टी भागात तापमानात घट दिसून आल्याचं पहायला मिळतं. यामुळे वाढत्या उकड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. किनारपट्टीवर सरासरी कमाल तापमान ३४ अंशांवर राहिलं आहे. तर मध्य महाराष्ट्रात सरासरी ३९ तर मराठवाडा आणि विदर्भात कमाल पारा सरासरी ४२ अंश सेल्सिअस नोंद झाली आहे. मात्र मुंबईमध्ये काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना उन्हाच्या कडाक्याचा सामना करावा लागणार आहे.

Comments
Add Comment

पुण्याच्या गुडलक कॅफेत 'बन मस्का'मध्ये आढळले काचेचे तुकडे

पुणे: पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज रोडवरील (FC Road) गुड लक कॅफे एका धक्कादायक घटनेमुळे चर्चेत आला आहे. आकाश जलगी

शनिशिंगणापूर मंदिर भ्रष्टाचार प्रकरणी मुख्यमंत्री ॲक्शन मोडवर: गुन्हे दाखल करण्याचे आदेश!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात शनिशिंगणापूर मंदिराचा भ्रष्टाचार वाचला मुंबई: महाराष्ट्राचे

विधानभवनात पडळकर-खोतांनी फाडला बनावट दुधाचा बुरखा! नाव न घेता साधला जयंत पाटलांवर निशाणा

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या दूध भेसळीचा मुद्दा तापला आहे! भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि रयत क्रांती

Jan Surksha Bill : कोणाचाही आंदोलनाचा अधिकार काढलेला नाही… जनसुरक्षा विधेयकाबद्दल मुख्यमंत्री काय म्हणाले?

मुंबई : जनसुरक्षा विधेयक हे विधासभेमध्ये काल मंजूर करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत

दहीहंडी, गणेशोत्सव परवानगीकरिता ऑनलाइन सुविधा

प्रत्येक प्रभागात एक खिडकी कक्ष स्थापन विरार (प्रतिनिधी) : वसई-विरार शहर पालिका क्षेत्रात सार्वजनिक दहीहंडी

गणपतीपुळे मंदिरात लवकरच होणार ड्रेसकोड लागू

रत्नागिरी (वार्ताहर): महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व प्रसिद्ध तीर्थक्षेत्र रत्नागिरी