PM Narendra Modi: मराठी म्हणीचा वापर करुन पंतप्रधानांची विरोधकांवर बोचरी टीका

म्हणाले, 'बारशाला गेला आणि बाराव्याला आला'


मुंबई : वर्धा - महाराष्ट्र आणि देशातील पहिल्या टप्प्यातील मतदानाला आज सुरुवात झाली असून विदर्भातील वर्धा, नागपूर, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात मतदान करण्यात आले. यादिवशी विदर्भात आयोजित केलेल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजेरी लावली. चैत्र एकादशीनिमित्ताने पंढरपूरच्या विठुरायाला वंदन करतो, असे म्हणत पंतप्रधानांनी आपल्या भाषणाला सुरवात केली. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी पुन्हा एकदा मराठी म्हणीचा वापर करत काँग्रेसवर बोचरी टीका केली.


आपल्या देशात २०२४ पूर्वी नैराश्याचे वातावरण होते. वीज, पाणी, रस्त्यांच्या अनेक गावात समस्या होत्या. मात्र, गेल्या १० वर्षात आपल्या सरकारने २५ कोटी भारतीयांना गरिबातून बाहेर काढले. देशात ५० कोटींहून अधिक बँक खाते नव्याने उघडले आहेत. आता, विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्राचं स्वप्न दूर नाही. मोदी जो गॅरंटी देतो, त्यासाठी दिवसरात्र खपायला तयार आहे. असे मोदी यांनी सभेत म्हटले.



काँग्रेस आघाडीवर घाणाघात


काँग्रेस आणि इंडी आघाडी नेहमीच विकासविरोधी आणि शेतकरी विरोधी राहिली आहे. त्यामुळेच, देशातील शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट झाली आहे. काँग्रेस आघाडीच्या कामकाजासाठी मराठीत एक म्हण आहे, 'बारशाला गेला आणि बाराव्याला आला' असे म्हणत मोदी यांनी काँग्रेस आणि इंडिया आघाडीवर घाणाघात केला. यापूर्वी नागपूरच्या पहिल्या सभेतही पंतप्रधान यांनी मराठी म्हणीचा उल्लेख केला होता. त्यावेळी, पाण्यावर काठी मारल्यानंतर पाणी दुभंगत नाही, असे म्हटले होते. आता, पुन्हा एकदा मराठी म्हणीतून काँग्रेसवर हल्लाबोल केला.


दरम्यान, यावेळी राज्यातील महायुती सरकार महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी आणि विविध योजनांसाठी काम करत आहे. सिंचन योजना, दळणवळण यांसह अनेक क्षेत्रात महाराष्ट्रात मोठं काम होत असल्याचंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

Comments
Add Comment

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेची बैठक

संयुक्त राष्ट्रे : रशियाने यूक्रेनवर केलेल्या नव्या हल्ल्यांनंतर दोन्ही देशांमधील संघर्षाबाबत संयुक्त

Devendra Fadnavis: “दोन भाऊ येऊन गेले, पण त्यांना श्रीरामाची आठवणही झाली नाही”

नाशिक : निवडणुकीच्या रणधुमाळीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नाशिकच्या सभेतून उद्धव आणि राज यांच्यावर

Pune News :पुण्यातील रस्ते केले साफ,पुण्यात लवकरच आंतरराष्ट्रीय स्पर्धा.. नक्की काय होणार ?

पुणे: पुणे शहर आणि जिल्ह्यातील रस्त्यांची अवस्था हा नेहमीच नागरिकांसाठी कळीचा मुद्दा राहिला आहे.पण पुण्यातील

इंडियन आयडॉलमधून चमकलेला आवाज शांत; गायक प्रशांत तमांग यांचे वयाच्या ४३व्या वर्षी निधन

मुंबई : मनोरंजन विश्वासाठी धक्कादायक बातमी समोर आली असून, ‘इंडियन आयडॉल’च्या तिसऱ्या पर्वातून देशभर लोकप्रिय

स्वामी विवेकानंद यांची जयंती ; १० मुद्दे जे तुमचे भाषण गाजवतील

आज आपण 'युगपुरुष' स्वामी विवेकानंद यांची १६३ वी जयंती साजरी करणार आहोत. हा दिवस संपूर्ण भारतात 'राष्ट्रीय युवा

अशोक शिंदे बनले मनोवैज्ञानिक

अशा तीनही माध्यमांमध्ये अभिनेता अशोक शिंदे यांनी विविधांगी भूमिका साकारून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. आता