Monday, July 22, 2024
Homeताज्या घडामोडीWorld Heritage Day: का साजरा केला जातो जागतिक वारसा दिन?

World Heritage Day: का साजरा केला जातो जागतिक वारसा दिन?

जाणून घ्या या दिवसाचे महत्त्व, इतिहास आणि यंदाची थीम

मुंबई : आपल्या ऐतिहासिक वास्तू, संस्कृती, वारसा, वास्तू यांचे सौंदर्य टिकवून ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. कारण या वास्तू किंवा वारसा आपल्याला हजारो वर्षांपूर्वीचा इतिहास दाखवतात. यामुळेच आपण इतिहासाशी जोडले गेलो आहोत. पृथ्वीवरील सांस्कृतिक वारसा आणि विविधता यांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी १८ एप्रिल रोजी ‘वर्ल्ड हेरिटेज डे’ म्हणजेच जागतिक वारसा दिवस साजरा केला जातो. हा दिवस सर्वप्रथम संयुक्त राष्ट्रे शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संस्था अथवा युनेस्कोद्वारे [UNESCO] साजरा केला होता. नागरिकांना त्यांच्या सांस्कृतिक वारशाचे, विविध स्मारकांच्या जतनाचे महत्त्व समजण्यासाठी आणि ते जोपासण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

जागतिक वारसा दिनाचे महत्त्व

प्राचीन अवशेष जगाच्या वारशाचा भाग आहेत. त्यांचे रक्षण करणे महत्त्वाचे आहे. ते त्यांच्या सांस्कृतिक मूल्यासाठी ओळखले जातात आणि युनेस्कोने त्यांच्या सार्वत्रिक महत्त्वासाठी देखील मान्यता दिली आहे. ही वारसा स्थळे देखील पर्यटकांचे आकर्षण आहेत जे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देण्यास मदत करू शकतात. ते आपल्याला आपल्या समृद्ध इतिहासात आणि भूतकाळात डोकावण्यास मदत करतात ज्याबद्दल आपण पूर्वी अनभिज्ञ होतो. भावी पिढ्यांसाठी त्यांचे संरक्षण होणे गरजेचे आहे.

या दिवसाचा इतिहास

१९८२ मध्ये इंटरनॅशनल कौन्सिल ऑन मॉन्युमेंट्स अँड साइट्सने (आयसीओएमओएस) दरवर्षी १८ एप्रिल रोजी जागतिक वारसा दिन साजरा करण्याची कल्पना मांडली. पुढच्यावर्षी युनेस्कोच्या सर्वसाधारण सभेत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. तेव्हापासून दरवर्षी १८ एप्रिल ला हा विशेष दिवस साजरा केला जातो. हेरिटेज वास्तू आणि स्थळे अनेकदा मानवी क्रियाकलाप, नैसर्गिक आपत्ती आणि नागरीकरणाला बळी पडतात. हा दिवस त्यांचे संरक्षण आणि जतन करण्याचे महत्त्व पुन्हा प्रस्थापित करतो.

यंदा जागतिक वारसा दिनाची थीम

१९८३ सालापासून स्मारके आणि साइट्सवरील आंतरराष्ट्रीय परिषदेने थीम ठेवण्यास सुरुवात केली. त्या थीमनुसार हा दिवस साजरा केला जातो. या वर्षी विविधतेचा शोध घ्या आणि अनुभवा अशी थीम ठेवण्यात आली आहे.

भारतातील काही लोकप्रिय वारसा स्थळे :

  • आग्रा किल्ला

भारतातील सर्वात मोठे पर्यटन स्थळ ताजमहाल जवळ स्थित आग्रा किल्ला हे एक मोठे स्मारक आहे, ज्यामध्ये मुघल वास्तुकलेची झलक दिसते. त्याच्या उंच भिंती, तपकिरी दगडावरील कोरीवकाम आणि पांढऱ्या संगमरवरी इमारती भव्यता दर्शवतात. १९८३ मध्ये याला जागतिक वारसा स्थळ म्हणून नाव देण्यात आले.

  • ताजमहाल

जगातील ७ आश्चर्यांमध्ये समाविष्ट असलेला ताजमहाल हा मुघल वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. मुघल सम्राट शाहजहानने त्याची पत्नी मुमताजच्या स्मरणार्थ हे बांधले होते, असे म्हटले जाते. संगमरवरी बनलेल्या ताजमहालचे सौंदर्य क्षणात वेड लावते.

  • एलोरा आणि अजिंठा लेणी

ही देखील एक जागतिक वारसा आहे, जी विविध चित्रांसाठी प्रसिद्ध आहे. या बौद्ध धर्माच्या कथा दर्शवतात. या लेण्यांचे स्थापत्य त्यांना इतरांपेक्षा वेगळे बनवते. भारतातील सर्वात जास्त पुरातत्व स्थळे एलोरा आणि अजिंठा महाराष्ट्रात आहेत. हे रॉक-कट मंदिरांसाठी जगभरात प्रसिद्ध आहे.

  • हंपीची मंदिरे

कर्नाटकातील विजयनगर साम्राज्यात, तुंगभद्रा नदीजवळील १५ व्या शतकातील हंपीने जागतिक वारसा यादीत मानाचे स्थान पटकावले आहे. हंपीमध्ये अनेक सुंदर मंदिरे, वास्तू असून त्यावर विविध भित्तीचित्रे आहेत. जे इंग्लिश, पोर्तुगीज, चिनी, अरब लोकांशी होणाऱ्या व्यापाराचे दर्शन घडवतात. भारतातील ह्या प्रदेशातील सुबत्ता व संपन्नता जगभर आकर्षणाचे केंद्र होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -