Saturday, December 14, 2024
Homeताज्या घडामोडीAC government: ब्रह्मगिरीवर एसी सरकारचा स्तंभ बांधला

AC government: ब्रह्मगिरीवर एसी सरकारचा स्तंभ बांधला

देशाविरुद्ध अपराध केल्याचा गुन्हा त्रंबक पोलिसांकडून दाखल

त्र्यंबकेश्वर : पर्वतराज ब्रह्मगिरीवर एसी सरकारचा स्तंभ बांधल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली होती.या प्रकरणी देशाविरुद्ध अपराध केल्याचा गुन्हा अज्ञात आरोपींविरुद्ध त्रंबकेश्वर पोलीसांनी दाखल केला आहे. सात-आठ वर्षांपूर्वी हा स्तंभ बांधून झाला असून मीडिया मध्ये बातमी झळकली त्या नंतर पोलिसांनी स्वतःहून यात लक्ष घातले आहे. पोलीसांतर्फे गोपनीय शाखेचे सचिन गवळी यांनी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे. भादवि ५०५ एक ब व कलम १३५ प्रमाणे ही फिर्याद नोंदवून घेण्यात आली आहे.

भारत सरकारचा कायदा एसी सरकार मानत नाही अशी माहिती पुढे आली आहे.अज्ञात आरोपींनी सात आठ वर्षांपूर्वी ब्रह्मगिरीवर एसी सरकारचा स्तंभ उभारला. अपराध करण्याची प्रवृत्ती निर्माण होईल व सार्वजनिक शांततेचा भंग होईल अशाप्रकारे डोंगरावर बिना परवानगी बांधकाम करून आदिवासी भागात दहशत निर्माण होईल,अपराध करण्यास प्रवृत्त होईल अशा प्रकारे भीती निर्माण करण्याचे देशाविरुद्ध अपराध करण्याचे काम केले म्हणून ही फिर्याद दाखल आहे. पो नी बिपिन शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली याबाबत अधिक चौकशी सुरू आहे.

अशी आहे घटना :-

ब्रह्मगिरी पर्वतावर गोदावरी उगम स्थानाजवळ ग्रे नाईड फरशीचा स्तंभ उभारून पक्के बांधकाम केलेले आहे. ब्रह्मगिरी वन खात्याच्या अखत्यारीत येतो. सदर बाबत कोणतेही माहिती वनखात्याकडे नाही. कथित केशवाकुवर केसरी सिंह नामक एसी सरकार चालवतो. गुजरात मधील डांग प्रदेशात त्याने चालवलेले हे सरकार उदयास आले आहे.

भारत देश आमच्या मालकीचा असून फलक लावलेले ठिकाण आमच्या राज्याच्या अधिपत्याखाली असल्याचा दावा एसी सरकारचा आहे. तसेच भारत सरकार आमच्या अधिपत्याखाली येते असादेखील एसी सरकारने दावा केला आहे. कायद्याने स्थापन झालेल्या सरकारला एसी सरकार मानत नसून एसी सरकार, हे प्रतिसरकार म्हणून अस्तित्वात आहे. तर यात काही मंडळी निसर्ग पूजक आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -