जळगाव : राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातून काही दिवसांतच स्वगृही म्हणजेच भाजपमध्ये परतणार असलेले नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना जीवे मारण्याची धमकी देणारा कॉल (Death threat call) आला आहे. त्यांच्या घरी हा धमकीचा फोन आला होता. मात्र, धमकीचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून अज्ञात व्यक्तीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून एका अज्ञात फोनवरून छोटा शकीलचे नाव सांगत आपल्याला जीवे मारण्यात येणार असल्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचं खडसे यांनी म्हटलं आहे. एकनाथ खडसे यांना आतापर्यंत धमकीचे चार ते पाच फोन आले आहेत. हे फोन वेगवेगळ्या नंबरवरुन आणि विविध देशातून येत असल्याची माहिती एकनाथ खडसे यांनी दिली आहे. नुकताच अमेरिकेतून धमकीचा फोन आल्यानंतर त्यांनी जळगावच्या मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
याविषयी बोलताना एकनाथ खडसे म्हणाले, धमकी मागे राजकीय संबंध असेल असं वाटत नाही. पोलीस चौकशी करत आहेत, काय तथ्य आहे ते बाहेर येईल. अशा धमक्या बऱ्याच वेळा आल्या आहेत. त्यामुळे भीतीचे वातावरण नाही. काळजी घ्यावी म्हणून पोलिसांना सूचित केले आहे. छोटा शकील, दाऊद यांनी धमकी दिली असेल असं वाटत नाही. धमकी कुठूनही येऊ शकते. अलीकडे सॉफ्टवेअर इतकी डेव्हलप आहेत की मुक्ताई नगरला बसूनही फेक कॉल केला जाऊ शकतो. धमकी दिल्यानंतर कोणतीही मागणी करण्यात आलेली नाही, असंही खडसे यांनी सांगितलं.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार,…
ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांचे परवाने रद्द होणार मुंबई (प्रतिनिधी) : बनावट पनीर किंवा चीन ऍनालॉग वापरणाऱ्यांवर…
पालिका क्षेत्रात चार हजार ४०७ इमारती धोकादायक ठाणे (वार्ताहर) : ठाणे पालिका क्षेत्रात धोकादायक व…
काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे पालिकेचे आवाहन मुंबई (प्रतिनिधी): मुंबई चेंबूर येथील अमर महल जंक्शनजवळ नागरिकांना…
साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५ आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील मेष : हा…
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…