Tesla: टेस्ला कंपनीच्या अडचणीत वाढ! १० टक्क्यांहून अधिक कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर कुऱ्हाड

मुंबई : नाविन्यपूर्ण इलेक्ट्रिक वाहनं आणि इलॉन मस्क यांच्यामुळे नेहमीच चर्चेत असणाऱ्या टेस्लाने मोठी कर्मचारी कपात जाहीर केली आहे. टेस्ला शेअर्सच्या किंमतीत घसरण होत असल्यामुळे टेस्ला या जगातील आघाडीच्या इलेक्ट्रिक कार उत्पादक कंपनीने जगातील त्यांच्या एकूण मनुष्यबळातून १० टक्क्यांपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर कुऱ्हाड मारली आहे. त्याचबरोबर टेस्लाची वाढ आणि कंपनीच्या आगामी काळातील वाटचाली विषयीदेखील चर्चा होते आहे.


एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार एका मेमोमध्ये टेस्लाचे सर्वेसर्वा आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेल्या इलॉन मस्क यांनी कर्मचाऱ्यांना म्हटलं आहे की ''कर्मचारी कपातीचा त्यांना सर्वाधिक तिरस्कार वाटतो. मात्र असे केल्याशिवाय पर्याय नव्हता, हे करावंच लागणार होतं. तसेच पुढे आम्ही कंपनीचा सखोल आढावा घेतला आहे आणि जगभरातील मनुष्यबळ १० टक्क्यांनी कमी करण्याचा कठीण निर्णय आम्ही घेतला आहे' असे इलॉन मस्क यांनी सांगितले.


रनिंग पॉईंट कॅपिटल अ‍ॅडव्हायझर्सचे मुख्य गुंतवणूक अधिकारी असलेल्या मायकल अ‍ॅशले स्कलमन यांनी म्हटलं आहे की, नोकर कपातीपेक्षाही टेस्लासमोर गंभीर आव्हानं आहेत ही बाब अधिक नकारात्मक आहे.



इलेक्ट्रिक वाहनांच्या मागणीत घट


मात्र विश्लेषकांच्या मते, टेस्लाने कारचे नवीन मॉडेल आणि कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) गुंतवणूक केल्यामुळे कंपनीला खर्च कपात करण्याचा दबाव आला आहे. इलेक्ट्रिक कार उत्पादक कंपनी असलेल्या टेस्लाच्या जुन्या मॉडेलमध्ये बदल करण्याचा वेग मंदावला होता. व्याजदरात वाढ झाल्यामुळे ग्राहकांना महागड्या गाड्या घेणे शक्य होत नव्हते. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांच्या मागणीत घट होत असल्याचे टेस्लाने सांगितले. तसेच कंपनीचा ताजा तिमाही अहवाल या महिन्याअखेरीस सादर करण्यात येईल असे टेस्लाने म्हटले आहे.


Comments
Add Comment

Sleep: शांत आणि गाढ झोपेसाठी या युक्त्या वापरून पहा

मुंबई : आजच्या धावपळीच्या जीवनात पुरेशी आणि शांत झोप मिळवणे अनेक लोकांसाठी एक आव्हान बनले आहे. निद्रानाश (Insomnia) ही

हॉकी आशिया कपमध्ये भारतीय महिला संघ उपविजेता

अंतिम सामन्यात चीनकडून ४-१ ने पराभव बीजिंग : महिला हॉकी आशिया कपमध्ये भारतीय संघ उपविजेता राहिला. हांगझोऊ येथे

नेपाळ, फ्रान्सनंतर आता इंग्लंडमध्ये निदर्शन रॅली, लाखो लोकं रस्त्यावर

लंडन: नेपाळ आणि फ्रान्सनंतर आता आंदोलनाचे वारे ब्रिटनच्या रस्त्यावर देखील दिसून आले आहे. सर्वात महत्वाचे

महाराष्ट्रात सध्या मोठ्या प्रमाणावर कांद्याची विक्री नाही - नाफेड

मुंबई : नॅशनल ॲग्रीकल्चरल को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया लि.(नाफेड

"संजय राऊतसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही": आनंद परांजपे

मुंबई: संजय राऊतसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही अशा शब्दात अजित पवार गटातील राष्ट्रवादी

जयपूरमध्ये नाल्यात कार पडून सात जणांचा मृत्यू

जयपूर : जयपूरच्या शिवदासपुरा पोलीस स्टेशन परिसरातील प्रल्हादपुरा जवळ रिंग रोडच्या खाली असलेल्या पाण्याने