Ramnavmi: रामनवमी पूजेनंतर करा 'या' वस्तूंचे दान, सुख-समृद्धी व धनाचा होईल वर्षाव

मुंबई : रामनवमी हा हिंदू संस्कृतीत अत्यंत पवित्र दिवस मानला जातो. चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवव्या तिथीला रामनवमी साजरी केली जाते. भगवान श्री राम हे भगवान विष्णूचे सातवे अवतार मानले जातात. रामनवमीच्या दिवशी भगवान रामाची पूजा-अर्चा केल्याने विशेष फळ प्राप्त होते. या दिवशी देशभरातील राम मंदिरांमध्ये भगवान श्री रामाची पूजा केली जाते आणि राम जन्मोत्सव साजरा केला जातो. रामनवमीच्या पूजेसोबतच या काही गोष्टी केल्याने अडचणी दूर होतात आणि श्रीरामांची कृपा आपल्यावर राहते. या गोष्टी कोणत्या ते जाणून घेऊया.


रामनवमीला रामाची पूजा करताना रामरक्षास्तोत्र अवश्य पाठ करा. राम मंत्र, हनुमान चालीसा इत्यादींचे पठण केल्याने शाश्वत पुण्य तर मिळतेच त्यासोबत संपत्तीतही वाढ होण्याची शक्यताही जागृत होते.



रामनवमीला दुर्गामातेची पूजा आणि कन्या पूजेनंतर या गोष्टी दान करा-



  • रामनवमीच्या दिवशी गरीब आणि असहाय्य लोकांना दान आणि अन्नदान केल्याने तुम्हाला अनेक पटींनी पुण्य मिळेल. रामनवमीच्या दिवशी आपल्या ज्येष्ठांचे आशीर्वाद अवश्य घ्या.

  • रामनवमीच्या दिवशी जवळच्या राम मंदिरात जा, दिवा लावा, प्रसाद द्या आणि पूजा झाल्यावर प्रसाद जास्तीत जास्त लोकांना वाटा. नवमीच्या दिवशी अविवाहित मुलींना अन्नदान करा. यामुळे माता दुर्गा प्रसन्न होऊन लोकांना आशीर्वाद देतात.

  • हिंदू धर्मात अन्नदान सर्वोत्तम मानले जाते. भुकेल्या किंवा गरजू व्यक्तीला अन्नदान केल्याने देव प्रसन्न होतो. तथापि, आपण कधीही खराब झालेले किंवा शिळे अन्न दान करू नये याची विशेष काळजी घ्या. असे करणे म्हणजे अन्न ग्रहण करणाऱ्या व्यक्तीचा आणि माता अन्नपूर्णाचा अपमान आहे.

  • रामनवमीला मंदिरात भगवा ध्वज दान करा आणि दुधात कुंकू टाकून देवाला अभिषेक करा यामुळे जीवनात धनसंपत्ती मिळते. असा उपाय केल्याने जीवनात आर्थिक लाभ होण्याची शक्यता असते आणि आयुष्यात कधीही पैशाची कमतरता भासत नाही.

  • याशिवाय रामनवमीला तुम्ही तुमच्या भक्तीनुसार गरिबांना कपडे आणि अन्न दान करू शकता.

Comments
Add Comment

हत्ती हटेना... वनविभाग पथक हतबल!

गोवा वन खात्याचे पथक सिंधुदुर्ग सीमेवर सतर्क ओंकार हत्ती आज दिवसभर नेतर्डे परिसरात ठाण मांडून असल्याने गोवा

सात वर्षांच्या बांधकामांनंतर खड्डेमय ‘पलावा’चे उद्घाटन

७२ कोटींच्या खर्चानंतरही उड्डाणपुलाला ‘निसरडा भागा’ची उपमा मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील कल्याण-शीळ

पीएच. डी. शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू

लखनऊ (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशातील प्रख्यात बनारस हिंदू विद्यापीठात शिकणाऱ्या २७ वर्षीय परदेशी

वर्गमित्रांनीच ८ विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत टाकले फेविक्विक

भुवनेश्वर (वृत्तसंस्था) : ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यातील फिरिंगिया ब्लॉकमधील सलागुडा येथील सेवाश्रम शाळेत सर्व

अमेरिका रशियावर कठोर निर्बंध लादणार

नाटोला चीनवर ५० ते १०० टक्के टॅरिफ लादण्याची मागणी वॉशिंग्टन डीसी (वृत्तसंस्था) : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष

मुंबईकरांना यंदा पाण्याचे ‘नो टेन्शन’

पुरवठा करणाऱ्या धरण, तलाव क्षेत्रांतील पाणीसाठा ९८.४० टक्के शेवटच्या १७ दिवसांत १.६० टक्के साठ्याचे