Monday, July 15, 2024
Homeताज्या घडामोडीTISS Mumbai recruitment: TISS मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 'या' पदांसाठी होणार भरती

TISS Mumbai recruitment: TISS मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ पदांसाठी होणार भरती

नोकरीसंबंधी सर्व माहिती सविस्तर जाणून घ्या

मुंबई : मुंबईच्या टाटा इन्स्टिट्युट ऑफ सोशल सायन्सद्वारे (TISS) असिस्टंट प्रोफेसरच्या पदासाठी भरतीची अधिकृत सूचना जाहीर करण्यात आली आहे. या भरती मोहिमेंतर्गत दोन पदांसाठी भरती केली जाणार आहे. भरतीचे ठिकाण मुंबई आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्या पात्र उमेदवार या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. त्याआधी नोकरीसाठीची शैक्षणिक पात्रता, पद, वेतन, अर्जाची प्रक्रिया, अर्ज शुल्क, अर्जाची अंतिम तारीख यासंबंधीची माहिती येथे जाणून घ्या.

शैक्षणिक पात्रता आणि वेतन

असिस्टंट प्रोफेसरच्या भरतीसाठी पात्र उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेमधून कायद्यातील बॅचलर पदवी असावी. अधिक माहितीसाठी अधिकृत नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा. असिस्टंट प्रोफेसर पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला शैक्षणिक स्तर – १० मधील ७ व्या CPC (Centralized Placement Cell) नुसार पगार मिळेल.

अर्जासाठी लागणारे शुल्क:

SC/ST/PWD उमेदवार: २५० रुपये
इतर सर्व उमेदवार: १००० रुपये
महिला उमेदवार: Nil

अर्जाची अंतिम तारीख:

लेखा सहाय्यक पदावर नोकरी मिळवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी अर्जाची अंतिम तारीख २८ एप्रिल २०२४ आहे.

TISS Mumbai Recruitment 2024 :

अधिकृत वेबसाईट https://tiss.edu/

अधिकृत नोटीफिकेशन – https://tiss.edu/uploads/files/Advertisement_-_Assistant_Professor_LMRF_MAR_2024.pdf

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -