- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; प्रत्येक प्रकल्प तीन वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन
मुंबई : "राज्यातील मुंबई, पुणे आणि नागपूर यांसारख्या प्रमुख शहरांमधील वाहतूक कोंडी फोडून नागरी विकासाला मोठी गती देण्यासाठी मेट्रो प्रकल्पांची कामे वेगाने पूर्ण केली जात आहेत. येत्या २०३० पर्यंत राज्यात सुमारे ३०० किलोमीटर लांबीचे नवे मेट्रो मार्ग आणि १६१ स्थानके प्रवाशांच्या सेवेत दाखल करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. याशिवाय प्रत्यक्ष काम सुरू झाल्यापासून प्रत्येक प्रकल्प तीन वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन करावे", असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मंगळवारी दिले.
मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीची उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह मुख्य सचिव राजेश अग्रवाल व विविध विभागांचे वरिष्ठ सनदी अधिकारी उपस्थित होते.
गुवाहाटी : आसाममधील नागाव जिल्ह्यातील कटीमारी येथील केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) छावणीत सोमवारी घडलेल्या गोळीबाराच्या घटनेने संपूर्ण सुरक्षा ...
राज्यात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम, जलद आणि पर्यावरणपूरक करण्यासाठी तब्बल ६८३.५३ किलोमीटर लांबीचे मेट्रो नेटवर्क विकसित केले जात आहे. सध्या राज्यात १७४ किलोमीटरचे मार्ग प्रत्यक्ष सुरू असून २९१ किलोमीटरवर कामे प्रगतिपथावर आहेत. तसेच १३० किलोमीटर मार्ग मंजुरीच्या टप्प्यात असून ८७.१५ किलोमीटरचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार केला जात आहे. एकूण २ लाख ८० हजार ७५५ कोटी रुपयांच्या या मेट्रो प्रकल्पांमध्ये केंद्र सरकारचा २५,२१६ कोटी आणि राज्य सरकारचा थेट ५०,२५० कोटी रुपयांचा हिस्सा असून उर्वरित निधी एमएमआरडीए, स्थानिक स्वराज्य संस्था आणि कर्ज उभारणीद्वारे आयोजित केला जात आहे. (Devendra Fadnavis)
मीरा गाव ते गायमुख मेट्रोबाबत बैठक :
ठाणे आणि मीरा-भाईंदर परिसराला जोडणाऱ्या बहुप्रतिक्षित 'मेट्रो-१०' (मीरा गाव ते गायमुख) या ९.६८ किलोमीटरच्या मार्गाच्या उभारणीबाबत बैठकीत सविस्तर आढावा घेण्यात आला. ८ हजार ५०० कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पासाठी सर्व परवानग्या अंतिम टप्प्यात असून पाच उन्नत (एलिव्हेटेड) स्थानके असलेल्या या मार्गाचे काम पुढील तीन वर्षांत पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. (Devendra Fadnavis)
मुंबई : रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित, शिस्तबद्ध आणि प्रवाशांसाठी सुलभ करण्याच्या उद्देशाने रेल्वे कायदा, १९८९ मधील अनेक महत्त्वाच्या तरतुदींमध्ये ...
नव्या मेट्रो मार्गांची आखणी :
भविष्यातील गरजा लक्षात घेऊन राज्य शासनाने काही नवीन महत्त्वाकांक्षी मेट्रो मार्गांची आखणी केली आहे. यात मुंबईतील अणिक डेपो-वडाळा-गेटवे ऑफ इंडिया (मेट्रो-११), कांजूर-बदलापूर (मेट्रो-१४), वसई-विरार जोडणारा मार्ग (मेट्रो-१३), आणि छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडणारा विशेष कॉरिडॉर (मेट्रो-८) यांचा समावेश आहे. त्यासोबतच पुण्यात हडपसर-लोणी काळभोर, निगडी-चाकण (फेज-३) आणि नवी मुंबईत बेलापूर ते नवी मुंबई विमानतळ या नवीन मार्गांमुळे पुढील काही वर्षांत महाराष्ट्रातील वाहतूक व्यवस्थेचा संपूर्ण कायापालट होणार आहे. (Devendra Fadnavis)





