Hardik Pandya : हार्दिक पांड्याची गोलंदाजी सर्वसाधारण, त्याचं नेतृत्वही साधारणच!

सुनील गावस्करांचं मुंबई इंडियन्सच्या कॅप्टनवर टीकास्त्र


पीटरसन म्हणाला, 'चाहत्यांकडून होत असलेल्या हूटिंगचा हार्दिक पांड्यावर परिणाम'


मुंबई : आयपीएल २०२४ (IPL 2024) साठी मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) कॅप्टन म्हणून हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नावाची घोषणा झाली आणि तेव्हापासूनच चाहत्यांनी नाराजीचा सूर मारला आहे. कॅप्टन बदलला तरी निदान सामने सुरु झाल्यानंतर मुंबई इंडियन्स आपला दबदबा कायम राखेल, अशी चाहत्यांना आशा होती. मात्र, चाहत्यांच्या आशेवर पाणी फिरत असल्याचे चित्र आहे. मुंबई इंडियन्स संघाला सहा सामन्यांपैकी चार सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे साहजिकच हार्दिक पांड्यावर चाहते आणखी नाराज झाले आहेत.


मुंबईच्या पराभवानंतर हार्दिक पांड्याच्या नेतृत्वावर अनेक माजी खेळाडूंनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. याबद्दल माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) आणि इंग्लंडचा माजी कर्णधार केवीन पीटरसन (Kevin Pietersen) यांनी देखील आपलं मत व्यक्त केलं. 'हार्दिक पांड्याची गोलंदाजी सर्वसाधारण, त्याचं नेतृत्वही साधारणच आहे', असं सुनील गावस्कर यांनी स्पष्टपणे सांगितलं.


सुनील गावस्कर म्हणाले, हार्दिक पांड्याने आतापर्यंत प्रभावी नेतृत्व केलं नाही. त्याने अनेक चुका केल्या आहेत. हार्दिक पांड्याची गोलंदाजी सर्वसाधारण राहिली, त्याशिवाय त्याचं नेतृत्वही साधारणच राहिलं. शिवम दुबे आणि ऋतुराज गायकवाड चांगली फलंदाजी करत होते. चेन्नईला १८०-१९० पर्यंत रोखायला हवं होतं. हार्दिक पांड्याकडून आतापर्यंतची सर्वात खराब गोलंदाजी करण्यात आली, असं सुनील गावस्कर म्हणाले.



केवीन पीटरसन काय म्हणाला ?


इंग्लंडचा माजी कर्णधार केवीन पीटरसन याने हार्दिक पांड्याच्या नेतृत्वावर टीकास्त्र सोडलं. पीटरसन म्हणाला की, प्लॅन ए फेल ठरल्यास तुम्ही प्लॅन बी चा वापर का केला नाही? हार्दिक पांड्याने आपल्या फिरकी गोलंदाजांचा वापर का केला नाही? हे न समजण्यासारखं आहे. टीम मिटिंगमध्ये प्लॅन ए ठरला असेल. पण हा प्लॅन यशस्वी ठरला नाही, तर प्लॅन बी का वापरला नाही?


केवीन पीटरसनच्या मते हार्दिक पांड्याच्या कामगिरीवर मैदानाबाहेरुन चाहत्यांकडून होत असलेल्या हूटिंगचा परिणाम होत आहे. नाणेफेकीवेळी हार्दिक पांड्या हसून सगळं काही ठीक असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न करतो. पण प्रत्यक्षात असं काही नाही. या परिस्थितीमधून मी गेलो आहे. स्टेडियममधून केलं जाणारं हूटिंग तुमच्यावर मानसिक परिणाम करतेच, असं मत पीटरसनने व्यक्त केलं.

Comments
Add Comment

कांदिवलीत उंच इमारतीला आग; आठ जणांना वाचवले

मुंबई : रविवारी सकाळी कांदिवली (पश्चिम) येथील अग्रवाल रेसिडेन्सी या उंच इमारतीत लागलेल्या आगीने परिसरात खळबळ

MPSC 2026 चे वेळापत्रक जाहीर, सविस्तर वाचा

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) २०२६ मध्ये घेतल्या जाणाऱ्या विविध परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

मुंबई मेट्रो प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, गुंदवलीवरून थेट गाठता येणार मिरा रोड

मुंबई : मुंबईतील मेट्रो प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सध्या गुंदवलीवरून निघालेली मेट्रो दहिसर पूर्व

देशामध्ये २२ बनावट विद्यापीठे

‘यूजीसी’ने जाहीर केली यादी मुंबई  : मान्यता नसलेल्या विद्यापीठांमुळे दरवर्षी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व

आरटीओ कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण अटळ

मुंबई : आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आकृतीबंधाची पूर्वलक्षी प्रभावाने अंमलबजावणी करावी. सर्व रिक्त पदांवर

पोलिसांनी दंड आकारल्याने झाडावर चढून तरूणाचे आंदोलन

मुंबई: मु्ंबई वाहतूक पोलिसांनी दंड आकारल्याने एका चालकाने चक्क झाडावर चढून अनोखे आंदोलन केले. तब्बल दोन तास