राजकीय फायद्यासाठी लहान मुलांचा वापर का?

राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे निवडणूक आयुक्त व राज्य निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र


उबाठा गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंविरोधात कारवाईची मागणी


मुंबई : राजकीय फायद्यासाठी किंवा निवडणूक प्रचारात लहान मुलांचा वापर कोणत्याही परिस्थितीत निषेधार्थ आहे. मात्र, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी निवडणूक आयोगाचे नियम हे धाब्यावर बसवले आहेत. नागपूर येथे वर्ध्याचे खासदार आणि महायुतीचे उमेदवार रामदास तडस यांच्या विरोधात पत्रकार परिषद घेताना सुषमा अंधारे यांनी तडस यांचा १७ महिन्यांच्या नातवाला देखील मंचावर उपस्थित केलं होतं. आता राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने या प्रकरणाची दखल घेत आयोगाच्या अध्यक्षा ॲड. सुशीबेन शहा यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक अधिकारी राजीव कुमार आणि राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांना पत्र लिहिलं आहे, याबाबत कठोर कारवाईची मागणी केली आहे.


निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निर्देशानुसार, प्रचारसभा, मोर्चा, घोषणाबाजी, पोस्टर चिकटवणे अशा निवडणुकीसंदर्भात कोणत्याही कामासाठी लहान मुलांचा वापर केला जाऊ शकत नाही. राजकीय नेत्यांनी आणि उमेदवारांनी लहान मुलांना हातात धरुन, वाहनात किंवा रॅलीमध्ये घेऊन जाणे तसेच कोणत्याही प्रकारे प्रचाराच्या कामांसाठी मुलांचा वापर करू नये, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत.


कविता, गाणी, उच्चारलेले शब्द, राजकीय पक्ष/उमेदवार यांच्या चिन्हाचे प्रदर्शन, राजकीय पक्षाच्या विचारसरणीचे प्रदर्शन, एखाद्या पक्षाच्या यशाचा प्रचार यासह कोणत्याही प्रकारे राजकीय मोहिमेचे स्वरुप निर्माण करण्यासाठी मुलांचा वापर करण्यापर्यंत विस्तारित आहे. यात विरोधी राजकीय पक्ष किंवा उमेदवार यांच्यावर टीका करण्यासाठीही मुलांचा वापर होऊ शकत नाही; असे निर्देश निवडणूक आयोगाने स्पष्ट शब्दांत दिले आहेत, अशी माहितीही ॲड. शहा यांनी दिली.


सुषमा अंधारे यांनी राजकीय स्वार्थासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशांची पायमल्ली केल्याचे स्पष्ट होत आहे. महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने या प्रकरणाची दखल घेतली असून आयोग स्तरावर याची चौकशी होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या माध्यमातून या प्रकरणी लक्ष घालून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी ॲड. सुशीबेन शहा यांनी पत्राद्वारे केली आहे.

Comments
Add Comment

बळजबरीने धर्मांतर केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास; ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम २०२६’मध्ये कठोर तरतुदी

मुंबई: राज्यात गेल्या काही काळापासून प्रलोभने, फसवणूक आणि बळजबरीने होणाऱ्या धर्मांतराच्या घटनांमध्ये वाढ झाली

Ratnagiri: रत्नागिरीत भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीती

रत्नागिरी: कोकणात सध्या अनेक गावात पालखी येते.त्यामुळे कोकणवासियांची कोकणात प्रचंड गर्दी जमली आहे. अनेक

आपले सरकार सेवा केंद्र व्यवस्थापकांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक; राज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती

मुंबई: राज्यातील 'आपले सरकार सेवा केंद्र' प्रकल्पात कार्यरत असलेल्या तालुका, जिल्हा आणि ब्लॉक व्यवस्थापकांच्या

'सांगली-सातारा येथील सराफ व गलाई बांधवांच्या अडचणी सोडवण्यासाठी गृह विभाग स्वतंत्र कक्ष स्थापन करणार'

मुंबई : देशभरात सोन्या-चांदीच्या व्यवसायात नाव लौकिक मिळवलेल्या सांगली आणि सातारा जिल्ह्यातील गलाई बांधव आणि

घरगुती गॅस सिलेंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष स्थापन

मुंबई: इराण - इस्राईल युध्दाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या घरगुती व व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडर

'एआय' तंत्रज्ञानाच्या मदतीने गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन वाढवणार; मत्स्यव्यवसाय विकास मंत्री नितेश राणेंनी दिली माहिती

मुंबई: राज्यात गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन वाढवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर सुरू