Nilam Gorhe : कोणाचे दिवस आलेत आणि कोणाचे दिवस भरलेत हे लवकरच कळेल!

नीलम गोऱ्हे यांची उद्धव ठाकरेंवर सणसणीत टीका


मुंबई : विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (Nilam Gorhe) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर हल्लाबोल केला आहे. कोणाचे दिवस आलेत आणि कोणाचे दिवस भरलेत, हे लवकरच कळेल. हे चार जूनला सिद्ध होणार आहे, अशी सणसणीक टीका नीलम गोऱ्हे यांनी केली आहे. 'संजय राऊत (Sanjay Raut) प्रचंड ज्ञानी आहेत, मी त्यापुढे सामान्य कार्यकर्ती आहे. त्यामुळे कुठलं उत्तर न देणे हे महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताचं आहे', असं म्हणत त्यांनी संजय राऊतांनाही टोला लगावला आहे.


नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना म्हटलं की, उद्धव ठाकरेंच्या मनात प्रचंड द्वेष आहे. त्या संतापाच्या भरात ते बोलत असतात. जामिनावरील लोकांचं काय मत आहे. हे चार जूनला सिद्ध होणार आहे. कोणाचे दिवस आलेत आणि कोणाचे दिवस भरलेत, हे लवकरच कळेल. राजकीय दृष्ट्या जनाधार संपला, एवढं मात्र उद्धव ठाकरे यांच्या लक्षात येईल, असं नीलम गोऱ्हे म्हणाल्या.


नीलम गोऱ्हे यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधताना म्हटलं आहे की, प्रत्येक पक्ष हे काम करतच असतात. राहुल गांधींनी त्यांनी केलेलं वचन, जाहीरनामे आणि निवेदन आणि मनमोहन सिंहाच्या काळातील निर्णयाचे कागद फाडून टाकले होते. तसे स्वतःच्या खासदारांचे निर्णय ते फाडून टाकणार नाही याचे उत्तर पहिले त्यांनी द्यावे. रश्मी बर्वे प्रकरणांमध्ये जे काही निर्णय घेतलेले आहे, त्याबद्दलची सहानुभूती मिळून उलट महिला मतदारांची लोकप्रतिनिधींची ही जबाबदारी आहे.


Comments
Add Comment

तुळजापूर मंदिरात २ दिवस व्हिआयपी दर्शन बंद

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर

अतिवृष्टीचा फटका बसलेल्या मत्स्यव्यावसायिकांना आधार देणार

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात मागील काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीसह मत्स्यव्यवसायालाही

मुंबई-अमरावती विमान पुन्हा रद्द, एअरलाइनने दिला ऑपरेशनल समस्येचा हवाला

अमरावती : अलायन्स मुंबईवरून आणि मुंबईला जाणाऱ्या विमानाचे एअरच्या येणाऱ्या उड्डाण शुक्रवारी (ता. तीन) रद्द

नगराध्यक्ष पदांचे आरक्षण सोमवारी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर राज्यातील २४७ नगर परिषदा व ४२ नगरपंचायतींच्या निवडणुका

गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ? पोलिसांची बजावली नोटीस

पुणे: महाराष्ट्राची लोकप्रिय नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या मालकीच्या कारला पुणे-मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय

उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदेंचा व्हॅनिटी व्हॅन टोला

दसऱ्याच्या पवित्र मुहूर्तावर महाराष्ट्राच्या राजकारणात दोन शिवसेनांचे मेळावे झाले. एकनाथ शिंदे यांच्या