Tuesday, June 17, 2025

मोबाईल धारकांना बसणार महागाईचा भडका?

मोबाईल धारकांना बसणार महागाईचा भडका?

सामान्यांच्या खिशाला लागणार कात्री!


मुंबई : आजच्या या आधुनिक युगात मोबईल फोन अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत आहे. प्रत्येकाच्याच आयुष्यातील मोबाईल हा अविभाज्य घटक झाला आहे. मात्र याच मोबाईलमुळे देशातील सामान्य नागरिकांच्या खिशाला चांगलाच फटका बसण्याची शक्यता आहे. आगामी काही महिन्यांत देशातील दूरसंचार कंपन्या (Telecom Company) लवकरच आपल्या मोबाईल टॅरिफ प्लॅन्समध्ये (Mobile Tariff Plans) वाढ करणार असल्याचे सांगितले आहे.



मोबाईल टॅरिफ प्लॅन्स वाढवण्याची शक्यता


मोबाइल बिल, ब्रॉडबँडचे बिल वाढण्याची शक्यता आहे. टेलिकॉम उद्योगात १५ ते १७ टक्के दरवाढ होईल, याचा फायदा एअरटेलला होईल, असा अंदाज अँटिक स्टॉक ब्रोकिंगच्या अहवालात वर्तविण्यात आला आहे. यापूर्वी डिसेंबर २०२१ मध्ये २० टक्क्यांची शेवटची वाढ करण्यात आली होती. टॉप दोन कंपन्या प्रीपेड मोबाइल सेवा वापरणाऱ्यांसाठी कमीत कमी रिचार्जची किंमत वाढवत आहेत. शिवाय रिचार्जचा दर तोच ठेवून कालावधी कमी करण्याची शक्कल लढवताना दिसत आहेत. तसे झाल्यास आता मोबाईल वापरणे महागडे ठरण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा