मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra politics) अनेक उलथापालथी घडवून आणणारा एक निर्णय पाडव्याच्या दिवशी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी घेतला. त्यांनी विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि महायुतीला (Mahayuti) पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले. सोबतच लोकसभा आणि राज्यसभा नको तर मनसेने विधानसभेच्या तयारीला लागावे असेही त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. त्यामुळे विरोधी पक्षांकडून आणि मुख्यतः उद्धव ठाकरेंनी त्यांच्यावर टीका केली. शिवाय मनसे कार्यकर्त्यांमध्येही काही प्रमाणात संभ्रम निर्माण झाला आहे. या सगळ्याचं स्पष्टीकरण देण्यासाठी राज ठाकरे यांनी आज पक्षाच्या नेत्यांची आणि पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावत भूमिका समजावून सांगितली.
राज ठाकरे यांनी सांगितलं की, मी गुढीपाडव्याच्या मेळाव्यामध्ये नरेंद्र मोदींना का पाठिंबा देत आहे याबाबत सविस्तरपणे बोललो आहे. पहिल्या पाच वर्षांमध्ये त्यांच्या काही भूमिका पटल्या गेल्या नव्हत्या. त्यामुळे आम्ही टीका केली होती. मात्र, टीका करत असताना तेव्हा आम्ही काही मागितलं नव्हतं. ती मुद्द्यांवरती टीका होती. तसेच माझी टीका मला मुख्यमंत्रीपद हवं आहे किंवा माझे ४० आमदार फोडले आहेत म्हणून टीका केली नव्हती, तर मुद्द्यांवर केली होती, असा सणसणीत टोला राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) लगावला.
राज ठाकरे म्हणाले की, गेल्या पाच वर्षांमध्ये जे काही बदल झाले आहेत, त्या निर्णयांचं मी स्वागत सुद्धा केलं. यामध्ये राम मंदिर, कलम ३७० रद्द करणे असे चांगले निर्णय त्यांनी घेतले. मोदी नसते तर राम मंदिर झाले नसते अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली. आम्ही भूमिका बदलतो म्हणतात, मात्र आम्ही भूमिका बदलली नसून आम्ही मुद्द्यांवर बोलत असल्याचं राज ठाकरे यांनी यावेळी सांगितलं. ते पुढे म्हणाले की राम मंदिराचा मुद्दा अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. मोदी नसते तर हा मुद्दा प्रलंबितच राहिला असता त्यामुळे पुन्हा एकदा त्यांना संधी देणं गरजेचं असल्याने आम्ही त्यांना पाठिंबा दिला.
विकासाच्या दृष्टीने अनेक मुद्दे असून ते मोदी पूर्ण करतील असं राज ठाकरे म्हणाले. तरुणांना रोजगार, मराठी भाषेला अभिजात दर्जा असे अनेक विषय ते मार्गी लावतील अशी आशा असल्याचे राज ठाकरे म्हणाले. मोदी गुजरातचे असले, तरी त्यांचं गुजरात प्रेम स्वाभाविक आहे. मात्र, सर्वच राज्यांकडे त्यांनी आपल्या मुलांप्रमाणे लक्ष द्यावं असेही राज ठाकरे यांनी सांगितले.
राज ठाकरे यांनी ईडीच्या भीतीने भूमिका बदलल्याची टीका ठाकरे गटाकडून होत आहे. या पार्श्वभूमीवर त्यांना विचारले असता त्यांनी ‘ज्यांना कावीळ झाली आहे त्यांना सगळं तसंच दिसतं’ अशी प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितले की मी पक्षाचा म्हणून विचार करत असतो त्यामुळे एक कार्यकर्ता काय विचार करतो हे बघत नाही.
साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५ आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील मेष : हा…
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…
डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…
सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…
डॉ. महालक्ष्मी वानखेडकर इवलासा चिमणीसारखा अस्थिर जीव जेमतेम दहा-बारा सेंटीमीटरचा. नाकापासून ते पाठीपर्यंत काळ्या रंगाचे…
श्रीनिवास बेलसरे चित्रपटसृष्टीतील जुन्या कलाकारांनी, विशेषत: गीतकारांनी, सगळ्या नात्यांना किती सुंदरपणे प्रेक्षकांसमोर आणले ते पाहिले…