Monday, May 12, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडी

Water Shortage: पाणी नाही तर मतदान नाही! पाणीटंचाईच्या समस्येने त्रस्त कल्याण रहिवाशांचा संताप

Water Shortage: पाणी नाही तर मतदान नाही! पाणीटंचाईच्या समस्येने त्रस्त कल्याण रहिवाशांचा संताप

कल्याण : वाढते तापमान व उन्हाच्या कडक झळांमुळे लोकांना पाण्याची अधिक गरज भासून येते. एकीकडे निवडणुकीचे वारे तर दुसरीकडे पाणीटंचाईच्या समस्या जास्तच तीव्र झाल्या आहेत. कल्याण लोकसभेतील अंबरनाथ मध्ये पाण्याच्या टंचाईने नागरिक त्रस्त झाले आहेत. पाणी टंचाईच्या त्रासाला कंटाळून कानसई विभागातील रहिवाशांनी थेट मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचा इशारा दिला आहे. प्रशासन आता तरी या नागरिकांच्या समस्येकडे लक्ष देते का हे पहावे लागेल. (kalyan loksabha election)


अंबरनाथ पूर्वेच्या कानसई विभागातील स्वामी देवप्रकाश गृहसंकुलात मागील अनेक महिन्यांपासून पाण्याची समस्या आहे. जवळपास सव्वाशे कुटुंब राहत असलेल्या या गृह संकुलात केवळ १०मिनिटे पिण्याचं पाणी येत असल्याची तक्रार रहिवाशांनी प्रशासनाकडे केली आहे. मात्र तक्रारी करूनही पुरेसं पिण्याचं पाणी मिळत नसल्याने गृहसंकुलातील रहिवाशी त्रासले आहेत. त्यामुळे त्रस्त रहिवाशांनी थेट आगामी निवडणुकांमध्ये मतदानावरच बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. गृहसंकुलाच्या प्रवेशद्वारावरच रहिवाशांनी "पाणी नाही तर मतदान नाही" असा इशारा देत आपला संताप व्यक्त केला आहे.


पाणी प्रश्नाबाबत स्वामी देवप्रकाश गृहसंकुलात नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिल्याने माजी नगरसेविका अपर्णा भोईर आणि मनसेचे शहराध्यक्ष कुणाल भोईर यांनी या नागरिकांची समस्या जाणून घेत त्यांच्याशी चर्चा केली. प्रशासनाने जर लवकरच हा पाणी प्रश्न सोडवला नाही तर उपोषण करणार असल्याचं इशारा माजी नगरसेविका अपर्णा भोईर यांनी दिला आहे.

Comments
Add Comment