Cholesterol: हृदयविकार, मधुमेह आणि लठ्ठपणाची चिंता? मग 'हा' पदार्थ करेल कोलेस्ट्रॉलवर मात

केवळ कोलेस्ट्रॉलच नव्हे तर शरीर स्वास्थसाठी होतील याचे अनेक फायदे


मुंबई : वाढते शहरीकरण, आजचे धकाधकीचे जीवन, खाण्याच्या सवयी, शारीरिक व्यायामाचा अभाव आणि कमी पौष्टिक आहार या गोष्टी सध्या तरुणांमध्ये दिसत आहेत. आजकालच्या बदलत्या जीवनशैलीमुळे याचा परिणाम वृद्ध लोकांसह युवकांमध्ये होत आहे व त्यांच्यामध्ये कोलेस्ट्रॉलचे (High Cholesterol) प्रमाण वाढत आहे. कोलेस्टेरॉल हे हृदयविकार, मधुमेह आणि लठ्ठपणाचे कारण असून त्यावर नियंत्रण ठेवणं कठीण आहे. कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी व्यायामासोबत योग्य आहारा घेणे फार गरजेचे आहे. तुमच्या स्वयंपाकघरातील हा पदार्थ तुम्हाला कोलेस्ट्रॉलवर मात करण्यासाठी मदत करु शकतो.


प्रत्येक घरात स्वयंपाकात नारळाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. घरांमध्ये 'नारळाची चटणी' ही आवर्जून बनवली जाते. न्यूट्रिशनिस्ट आणि डाएटिशियननुसार ही पांढरी नारळाची चटणी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. नारळाची ही चटणी सेवन केल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. त्याशिवाय रक्तदाब नियंत्रित करणे, कोलेस्ट्रॉल कमी करणे आणि पचन सुधारण्यासाही मदत मिळते. मात्र या चटणीत सॅच्युरेटेड फॅट असल्याने ती योग्य प्रमाणात सेवन करावी लागते. अन्यथा तिचे शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतात.


न्यूट्रिशनिस्ट आणि डाएटिशियननुसार नारळात जास्त प्रमाणात फायबर असते. त्यामुळे ही नारळाची चटणी दररोज २-३ चमचे खाल्ल्यामुळे तुमची पचनक्रिया सुधारते. त्याशिवाय या चटणीचं सेवन केल्यामुळे पोटदुखी, जुलाब आणि बद्धकोष्ठता सारख्या समस्यांपासून मुक्तता मिळते. नारळाच्या चटणीत अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असल्याने ती आपल्या शरीरासाठी अतिशय फायदेशीर असते. यामुळे उच्च रक्तदाबाची समस्या दूर होते व शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी सुधारण्यास मदत मिळते. इतकेच नव्हे तर हृदयाशी संबंधित आजाराचा धोकादेखील टळतो. अगदी तुम्हाला वजन कमी करायचं असेल तरीही नारळाची चटणी उपयुक्त ठरते. कारण या चटणीचे सेवन केल्यामुळे मेटाबॉलिज्म रेट वाढतं आणि त्यामुळे तुमचं वजन कमी होण्यास मदत मिळते. अशा प्रकारे वैज्ञानिकांनुसार फायबर भरपूर असलेल्या नारळाच्या चटणीने हाय कोलेस्ट्रॉलने हैराण असणाऱ्या लोकांना मदत मिळू शकते.

Comments
Add Comment

Shravan : श्रावणात मांसाहार का करीत नाहीत? केवळ धार्मिक कारण की आणखी काही, आयुर्वेदाचे नियम काय सांगतात?

श्रावण महिना धार्मिकदृष्ट्या अत्यंत पवित्र मानला जातो. या दरम्यान भगवान शंकराची पूजा केली जाते. या काळात

नाचणीची भाकरी रोज खाणे योग्य आहे का? कॅलरी, प्रोटीन आणि फायद्यांची माहिती

नाचणीला सुपरफूड मानले जाते, कारण ते वजन नियंत्रित ठेवण्यासाठी, रक्तातील साखर (शुगर) नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि

अन्नाची अॅलर्जी : असहिष्णुता की संवेदनशीलता?

अनेकांना एखादा अन्नपदार्थ खाल्ल्यानंतर शिंका येणे, श्वास घेताना घरघर होणे, अंगावर पुरळ उठणे, पोट फुगणे, जुलाब,

EAR CARE : कान स्वच्छ करताना बाळगा विशेष काळजी; टोकदार वस्तूंचा वापर ठरू शकतो घातक, तज्ज्ञांचा सल्ला महत्त्वाचा

शरीराची स्वच्छता राखणे जितके महत्त्वाचे आहे, तितकीच कानांची काळजी घेणे देखील अत्यंत गरजेचे असते. मात्र, कानातील

Health Care : पावसाळा आणि आरोग्याची काळजी; आरओ की उकळलेले पाणी? कोणते पिणे योग्य?

पावसाळा सुरू झाला की वातावरणात बदल होतो आणि साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वेगाने वाढू लागतो. या दिवसांत दूषित

Viral Cocktail : पावसाळ्यात 'व्हायरल कॉकटेल'चा धोका; कोविड, H1N1 आणि इन्फ्लूएंझा 'ए'ची लक्षणे दिसल्यास करू नका दुर्लक्ष

मुंबई: पावसाळ्याच्या वातावरणात कोविड-१९, H1N1 आणि इन्फ्लूएंझा 'ए' हे तिन्ही विषाणू एकाच वेळी सक्रिय झाल्यामुळे