Apple Company: युवकांसाठी मोठी संधी! 'ही' कंपनी देणार ५ लाख नोकऱ्या

मुंबई : रोजगाराच्या शोधात असणाऱ्या युवकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. युवकांसाठी एका मोठ्या कंपनीत नोकरीची संधी मिळणार असल्यामुळे आता दिलासा मिळणार आहे. आयफोन निर्मिती ॲपल कंपनीमध्ये लाखो नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार पुढच्या तीन वर्षात ॲपल कंपनीमध्ये पाच लाख नोकऱ्या निर्माण होणार आहेत.


तब्बल पाच लाख नोकरीच्या संधी उपलब्ध होणार असल्याने भारतातील नोकऱ्यांची संख्या तीन पटीनं वाढणार आहे. ॲपल कंपनी भारतात अधिक गुंतवणूक करुन आपलं उत्पादन झपाट्याने वाढवणार असल्याचा विचार करत आहे. कंपनीच्या व्यवसायाचा विस्तार करण्याच्या संदर्भाने हालचीलांना देखील वेग आला आहे.



आयफोन उत्पादनात २५ टक्के वाढ होण्याची शक्यता


मिळालेल्या माहितीनुसार, ॲपल कंपनी पुढील तीन वर्षात भारतात पाच लाख नोकऱ्या देणार आहे. यामुळे ॲपल कंपनी संबधीत कर्मचाऱ्यांच्या संख्येत तीन पटीने वाढ होणार आहे. तर या निर्णयामुळे अप्रत्यक्ष रोजगारातही वाढ होणार असल्याचे कळते. सध्या जगातील एकूण आयफोन उत्पादनापैकी ७ आयफोन हे भारतात तयार होतात. २०३० पर्यंत याची संख्या २५ टक्क्यांपर्यंत वाढू शकते. त्यामुळे देशात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. ही तरुणांसाठी मोठी संधी असणार आहे.


आठवडाभरापूर्वी ॲपल कंपनीने कॅलिफोर्नियामधील ६०० हून अधिक कर्मचाऱ्यांना कार आणि स्मार्टवॉच डिस्प्ले प्रकल्प बंद केल्याप्रकरणी काढून टाकले होते. मात्र आता ॲपल कंपनीला भारतातील उत्पादन वाढवायचे असून व्यवसायाचा या ठिकाणी मोठा विस्तार करायचा आहे. त्यामुळे ही कंपनी भारतातील युवकांसाठी ५लाख नोकऱ्यांची संधी उपलब्ध करुन देणार आहे. ज्या युवकांना ॲपल कंपनीमध्ये काम करायचे आहे, त्यांची इच्छा आता पूर्ण होण्यास मदत होणार आहे.


Comments
Add Comment

Night Walk : रात्रीच्या जेवणानंतर शतपावली किती महत्त्वाची?

शरीर निरोगी ठेवण्यासाठी अनेक लोक सकाळी व्यायाम आणि Morning Walk करतात. यामुळे नक्कीच शरीराला फायदे होतात यात काही शंका

Whatsapp Chat : WhatsApp चॅटला मिळणार नवा लूक; Iphone यूझर्ससाठी आकर्षक डिझाइनचं अपडेट लवकरच...

मुंबई : व्हॉट्सअ‍ॅप आपल्या IPhone यूझर्ससाठी चॅटिंगचा अनुभव अधिक आकर्षक करण्यासाठी नव्या डिझाइनवर काम करत आहे.

Ranbir Kapoor : 'रामायण'नंतर रणबीर कपूर 'धूम ४'मध्ये दिसणार का ? अभिनेत्याने स्वतःच केला खुलासा

मुंबई: बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर सध्या त्याच्या आगामी 'रामायण' या भव्य चित्रपटामुळे भलताच चर्चेत आहे. या

Kurti Designs : फॅशनप्रेमींसाठी खास! 'या' कुर्ती डिझाइन्स ज्या कधीच आउट ऑफ ट्रेंड होत नाहीत

अनारकली (Anarkali) कुर्ती https://prahaar.in/2026/07/27/eating-honey-daily-offers-these-amazing-health-benefits-find-out-what-the-experts-say/ पारंपरिक आणि एलिगंट लुकसाठी नेहमीच बेस्ट

Jeans Styling : स्टायलिश लूक साठी ; जीन्सची खरेदी करताना हा महत्त्वाचा सल्ला लक्षात ठेवा

आजकाल जीन्स हा प्रत्येकाच्याच वॉर्डरोबचा एक महत्त्वाचा आणि अविभाज्य भाग बनला आहे. ऑफिस, कॉलेज असो वा एखादी

Nashik : ८ हजारांहून अधिक नागरिकांनी केली रोपांसाठी नोंदणी, मिशन ग्रीन मान्सून उपक्रमासाठी नाशिककर सरसावले

Nashik : ‘मिशन ग्रीन मान्सून’ साठी नाशिककरांनी पुढाकार घेतला आहे. मंत्री गिरीश महाजन (Minister Girish Mahajan) यांच्या संकल्पनेतून