सांगली : महाविकास आघाडीत सांगलीच्या जागेवर आग्रही असणारे काँग्रेसचे नेते विशाल पाटील (Vishal Patil) यांचे बंधू प्रतिक पाटील यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांची भेट घेतली. त्यामुळे सांगलीत वंचितकडून विशाल पाटील यांना उमेदवारी देणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
महाविकास आघाडीत सांगलीच्या जागेवरून बराच वाद झाला होता. शेवटच्या क्षणापर्यंत रस्सीखेच सुरू होती. ठाकरे गटाने चंद्रहार पाटलांना सांगलीतून उमेदवारी घोषित केली. त्यावर काँग्रेसने तीव्र नाराजी व्यक्त केली. असं सर्व सुरू असताना, ही जागा ठाकरेंना देण्यात आली. परंतु आता ठाकरेंच्या उमेदवाराचा गेम होणार की काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
सांगलीच्या जागेवर आग्रही असणारे काँग्रेसचे विशाल पाटील यांचे बंधू प्रतिक पाटील यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली आहे. त्यामुळे सांगलीतून वंचित विशाल पाटील यांना उमेदवारी देणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
प्रकाश आंबेडकर आता काय निर्णय घेतात? याकडे सुद्धा लक्ष असेल. काँग्रेसने आधीच ठरवलं पाहिजे की महाराष्ट्रात त्यांना आपला अस्तित्व ठेवायचे की नाही? अशी विचारणा आंबेडकर यांनी केली आहे.
दरम्यान सांगलीमध्ये उबाठा गटात ताकद नसल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. ते म्हणाले की, आज सकाळी पाटील मला भेटून गेले आहेत. त्यामुळे पुढील निर्णय लवकरच घेऊ. सध्या कुठल्याही आग्रह केलेला नाही किंवा कुठलही सजेशन दिलं नसल्याचं आंबेडकर म्हणाले.
मुंबई(ज्ञानेश सावंत):सुरवातीच्या सामन्यात चेन्नईने मुंबईला फिरकीच्या जोरावर पराभवाचे पाणी पाजले. परंतु तो सामना चेन्नईच्या घरच्या…
पूजा काळे सृष्टीचे तत्त्व सांभाळा, नेहमीची येतो उन्हाळा. वर्षभरात तीन ऋतूंच्या तीन तऱ्हा सांभाळताना होणारा…
पुणे : काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात अध्यक्ष बदलला आहे. हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष झाले आहेत.…
डॉ. वीणा सानेकर भाषा हा शिक्षणातील पायाभूत घटक आहे. ती माणसाच्या अस्तित्वाची ओळख असल्यामुळे शिक्षणातील…
अर्चना सोंडे जगात ज्या काही दुर्मीळ आदिवासी जमाती आहेत. ज्यांचे पृथ्वीवरील अस्तित्व संपल्यात जमा झाले…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण सप्तमी शके १९४७. चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा. योग सिद्ध. चंद्र राशी…