Google Map: आता गुगल मॅप दाखवणार योग्य रस्ता; पण…

Share

मुंबई : सध्या Google Map वापरणे हा आपल्यातील अनेकांच्या सवयीचा भाग झाला आहे. कोठेही जायचे असल्यास सोयीस्कर मार्ग शोधण्यासाठी Google Map चा वापर करता. मात्र अनेकदा तुम्ही अशा रस्त्यावर पोहोचता की ज्या रस्त्यावरून वाहन जाणे कठीण असते. पण आता तुमच्यासोबत असे होणार नाही. Google Map यापुढे तुम्हाला खडबडीत रस्त्यावर नेणार नाही. यासाठी तुम्हाला ॲपवर फक्त या तीन सेटिंग्ज कराव्या लागतील. यानंतर तुम्ही खडबडीत रस्त्यापासून मुक्त होऊ शकाल.

Google Map तुम्हाला तुमच्या गंतव्यस्थानावर नेण्यासाठी उपयुक्त ठरते. पण काही चुकांमुळे कधी कधी तुम्ही चुकीच्या मार्गावर पोहोचता. आता तुम्हाला प्रश्न पडत असेल की हे कसे होऊ शकते? Google Map वापरत असताना येणाऱ्या अडथळ्यांची अनेक कारणे असू शकतात. यात तुमचे ॲप अपडेट न होणे, फोनमधील डेटा कमी असणे आणि योग्य ठिकाण न निवडणे यांचा समावेश आहे. जर सर्व काही व्यवस्थित काम करत असेल तर अशा परिस्थितीत या तीन सेटिंग्ज तुम्हाला मदत करू शकतात.

यासाठी नेव्हिगेट करताना नेहमी योग्य मोड निवडा. नेव्हिगेशन सेटिंग्जमध्ये हायवे टाळा पर्याय निवडून तो बंद करा. आयफोन सेटिंग्जमध्ये स्थान सेवा पर्याय निवडा आणि अचूक स्थान चालू करा. आता तुम्ही Google Map वापरू शकता, त्यानंतर तुम्ही अडकणार नाही.

कराव्या लागतील या तीन सेटिंग्ज

  • जेव्हा तुम्ही लोकेशन (Location service) तपासत असाल, तेव्हा प्रथम तुमचा योग्य वाहन मोड निवडा. कारण हे ॲप तुमच्या वाहनानुसार मार्गावर नेव्हिगेट करते. जर तुम्ही कारने असाल आणि वॉकिंग मोडवर क्लिक केले असेल, तर तुमचे वाहन पुढे जाताना अडकून पडणे साहजिक आहे. कारण Google Map तुम्हाला रस्त्यावरून जाणारा एक चालण्याचा मार्ग दाखवला आहे, पण तुम्ही त्या मार्गावर गाडीने जात आहात. त्यामुळे तुम्ही ज्या वाहनातून प्रवास करत आहात ते नेहमी निवडा.
  • खराब रस्त्यांऐवजी फक्त हायवे मार्गावरूनच प्रवास करायचा असेल, तर त्यासाठी तुम्हाला गुगल मॅपच्या उजव्या कोपऱ्यात दिलेल्या प्रोफाईल ऑप्शनवर क्लिक करावे लागेल. येथे सेटिंग्जमध्ये जा, तुम्हाला नॅव्हिगेशनचा (Navigation) पर्याय दाखवला जाईल, त्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला अव्हॉइड हायवेचा पर्याय दिसेल. त्यानंतर ते तुम्हाला फक्त महामार्गाचे सर्व मार्ग दाखवेल.
  • तुमच्या आयफोनच्या सेटिंगमध्ये जाऊन प्रायव्हसी अँड सिक्युरिटीवर (Privacy and Security) क्लिक करा, त्यानंतर लोकेशन सर्व्हिसवर क्लिक करा. येथे अचूक स्थान चालू करा.
Tags: google map

Recent Posts

Tomato Price Hike : टोमॅटोची ‘लाली’ आणखी वाढणार

नवी दिल्ली : टोमॅटोच्या दरात मोठी (Tomato Price Hike) वाढ झाली आहे. टोमॅटो उत्पादक राज्यांमध्ये…

9 mins ago

Ashadhi Ekadashi : आषाढीमुळे विठुरायाचे व्हीआयपी दर्शन बंद!

दर्शन रांगेतील भाविकांना मोठा दिलासा पंढरपूर : आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi) आता जवळ येऊ लागली…

34 mins ago

ग्राहकांची दिशाभूल टाळण्यासाठी FSSAI ची नवी नियमावली!

आता कंपन्यांना द्यावी लागणार मोठ्या अक्षरात माहिती मुंबई : एफएसएसआयचे (FSSAI) अध्यक्ष अपूर्व चंद्र यांच्या…

36 mins ago

Worli Hit and Run : ‘कोणताही राजकीय दबाव न आणता कारवाई करावी!’ गृहमंत्र्यांचे पोलिसांना आदेश

वरळीत महिलेला चिरडणारा 'तो' कारचालक शिवसेना शिंदे गटाच्या उपनेत्याचा लेक कायद्यासमोर सर्वांना समान वागणूक :…

1 hour ago

Dombivali Fire : डोंबिवलीत पुन्हा अग्नितांडव! सोनरपाड्यात कारखान्याला भीषण आग

परिसरात धुराचे लोट डोंबिवली : डोंबिवलीमधील एमआयडीसी (Dombivali MIDC Fire) परिसरातील अग्नितांडवाच्या घटना सातत्याने वाढत…

1 hour ago

Cow slaughter case : रायगड जिल्ह्यातील महाड येथील गोहत्येचा मुद्दा अधिवेशनात गाजणार!

DYSP शंकर काळे यांच्या निलंबनाची शक्यता? रायगड : छत्रपती शिवाजी महाराजांची पवित्र भूमी म्हणून रायगड…

2 hours ago