नागपूर : विदर्भात एकीकडे कडक उन्हाळा तर दुसरीकडे वादळी पावसाचा तडाखा अशा वातावरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पहिली सभा चंद्रपूरला पार पडली. यावेळी भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी १९८४ च्या दंगलीवरून काँग्रेसवर केलेली टीका आता राज्यभरात काँग्रेसचा त्यांच्याविषयी रोष ओढवताना दिसत आहे. दुसरीकडे बुधवारी नागपूर जिल्ह्यातील रामटेक मतदारसंघात मोदी येत आहेत.
पूर्व विदर्भातील नागपूर, रामटेक, भंडारा, गडचिरोली आणि चंद्रपूर या पाच जागांवर १९ एप्रिल रोजी मतदान होत आहे. सर्वच ठिकाणी भाजप-काँग्रेस किंवा शिवसेना अशा थेट लढती बघायला मिळत असताना पश्चिम विदर्भात मात्र बंडखोर,अपक्षांनी निवडणूक चुरशीची केली आहे. कमी दिवसांत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तुतारी चिन्ह मतदारांपर्यंत पोहचविण्याचे आव्हान वर्धेत काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे यांच्यापुढे आहे. खासदार रामदास तडस यांच्या स्नुषा पूजा तडस यांची अपक्ष उमेदवारी काळे यांना डोकेदुखी ठरत आहे.
दुसरीकडे अमरावती मतदारसंघात महायुतीशी थेट पंगा घेत आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षातर्फे दिनेश बुब यांनी उमेदवारी दाखल करत काँग्रेस आणि विद्यमान खासदार नवनीत राणा यांच्यातील लढत तिहेरी केली आहे. प्रहारला नेहमी कपबशी हे निवडणूक चिन्ह मिळत असले तरी यावेळी मात्र त्यांना शिट्टी निवडणूक चिन्ह मिळाले आहे. आता येत्या २६ एप्रिल रोजी होणाऱ्या या निवडणुकीत काँग्रेसचे आमदार बळवंत वानखेडे आणि खासदार नवनीत राणा यांच्याशी त्यांचा मुकाबला आहे.
रविकांत तुपकरांच्या प्रचाराचा फुटला नारळ
दुसरीकडे, बुलढाणा मतदारसंघात विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांच्यापुढे शिवसेना ठाकरे गटातर्फे नरेंद्र खेडेकर यांच्यासोबतच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर उभे ठाकले आहेत. तुपकर यांना निशाणी म्हणून पाना हे निवडणूक चिन्ह मिळाले आहे. त्यामुळे आता ते सगळ्यांचे नट कसणार, अशी प्रतिक्रिया जनसामान्यांमधून कानी पडत आहे. आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे राष्ट्रमाता जिजाऊंचे आशीर्वाद घेऊन तुपकर यांनी प्रचाराचा नारळ फोडला.
जिल्ह्यातील खिळखिळा झालेल्या विकास रथाच्या चाकाचे नट आता रविकांत तुपकर पाना फिरवून फिट करणार असल्याचा दावा समर्थक करीत आहेत. अमरावतीत निवडून आणा, असा असा नारा राणा दांपत्याकडून जोरात असताना बुलढाणा जिल्ह्यात दाखवा आता जनतेचा बाणा निवडून आणू पाना, पाना…र विकांत तुपकर निवडून आणा, असे नारे ऐकावयास मिळत आहेत. एकंदर विदर्भात प्रचार वेग धरताना दिसत आहे.
मुंबई(ज्ञानेश सावंत): रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा संघ पावसामुळे मागच्या सामन्यात पंजाब कडून दारुण पराभूत झाला. सुरुवातीचे…
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार,…
ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांचे परवाने रद्द होणार मुंबई (प्रतिनिधी) : बनावट पनीर किंवा चीन ऍनालॉग वापरणाऱ्यांवर…
पालिका क्षेत्रात चार हजार ४०७ इमारती धोकादायक ठाणे (वार्ताहर) : ठाणे पालिका क्षेत्रात धोकादायक व…
काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे पालिकेचे आवाहन मुंबई (प्रतिनिधी): मुंबई चेंबूर येथील अमर महल जंक्शनजवळ नागरिकांना…
साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५ आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील मेष : हा…