मुरूड : अदानी पोर्टच्या आगरदांडा येथे होणाऱ्या रेल्वे भू-संपादन मोजणीला येथील स्थानिक शेतकऱ्यांनी तीव्र विरोध करत येथून जाणारा रेल्वे मार्ग हा गावाबाहेरील महामार्गालगत पासून नेण्यात यावा तसेच सातबारा वरील पेन्सिल शेरा रद्द करण्यात यावा, आदी मागण्यांसह विरोध दर्शवत आज मोजणी होऊ दिली नाही.
महाराष्ट्र शासनाच्या भूमी अभिलेख (मुरुड-जंजिरा) विभागाने येथील शेतकऱ्यांना आज दि. १० एप्रिल रोजी आगरदांडा येथे रेल्वे भू-संपादन मोजणीसाठी संयुक्त नोटीस बजावण्यात आली होती. त्यानुसार सकाळी ९.३० वा. प्रत्यक्ष जागेवर हजर राहण्याचे सांगण्यात आले होते. त्याप्रमाणे आज आगरदांडा येथे रेल्वे भू-संपादन मोजणीला संबंधित शेतकऱ्यांनी उपस्थित राहून सदरचा रेल्वे मार्ग हा गावाबाहेरील महामार्गालगत पासून नेण्यात यावा तसेच सातबारा वरील पेन्सिल शेरा रद्द करण्यात यावा, अशी मागणी करत मोजणी होऊ दिली नाही.
यावेळी मुरुडच्या भूमी अभिलेखचे निमतानदार एम. पी. पोकळे, सहकारी तसेच रुषिकांत डोंगरीकर, यूसुफ अर्जबेगी, संतोष पाटील, आशिष नरेंद्र हेदूलकर, अर्पेश चिंदरकर, शब्बीर काझी, नजीर खतीब, तहसिन बशीर फकी, इमुद्दीन कादिरी, अहीर, मुब्बशिर खतीब आदिंसह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
मुंबई : झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवर पाच वर्षांपूर्वी 'देवमाणूस' (Devmanus) ही मालिका सुरु झाली…
मुंबई: "भिऊ नको मी तुज्या पाठीशी आहे" संकट काळात स्वामी समर्थांच हे वाक्य जगण्यासाठी नवी…
शिबानी जोशी जगभरात आज मराठी माणूस पोहोचला आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया यासारख्या देशात शिक्षणाच्या निमित्ताने, नोकरीच्या…
वर्षा फडके - आंधळे जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वपूर्ण पर्व ठरणारी ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल…
काश्मीरमध्ये गेले दोन दिवस पावसाने हाहाकार माजवला आहे आणि असे वाटते आहे की, निसर्गाचा कोप…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण नवमी शके १९४७. चंद्र नक्षत्र श्रवण. योग शुभ. चंद्र राशी…