Crime News: धक्कादायक! चेंबूरमधून अपहरण झालेली मुलगी तब्बल ८ महिन्यानंतर सापडली बिहारमध्ये

आरोपीलाही करण्यात आली अटक


मुंबई : एका ३० वर्षांच्या तरुणाने लग्नाचे अमिष दाखवून १५ वर्षांच्या मुलीचे अपहरण केल्याची घटना काही दिवसांपूर्वी चेंबूर परिसरात घडली होती. चेंबूरच्या वाशीनाका परिसरात पीडित मुलगी वास्तव्यास असून ती ऑगस्ट २०२३ मध्ये परिसरातून अचानक गायब झाली होती. बराच वेळानंतरही ती घरी न परतल्यामुळे तिच्या आई-वडिलांनी याप्रकरणी आरसीएफ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अनेक दिवस या मुलीचा शोध घेतला, मात्र ती सापडली नाही. यादरम्यान तिचे वडील काम करीत असलेल्या कारखान्यातील तरुण नरेश राय (३०) हादेखील त्याच दिवसांपासून कामावर आला नव्हता.


पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार आरोपी बिहारमध्ये असल्याचे समजले. आरसीएफ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण मांढरे आणि त्यांच्या पथकाने तत्काळ बिहारमध्ये जाऊन आरोपीचा शोध घेतला. मात्र तो वास्तव्याचे ठिकाण सतत बदलत असल्यामुळे सापडण्यात यश मिळत नव्हते. अखेर पोलिसांनी वेषांतर करून दोन दिवस बिहारमधील माधवपुरा परिसरात सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. मुलीला याच परिसरातील एका घरात ठेवल्याचे आरोपीने सांगितले. याप्रकरणी आरसीएफ पोलिसांनी बिहार येथून या मुलीची सुटका करून आरोपीला अटक केली.


Comments
Add Comment

ओडिसी इलेक्ट्रिक व्हेइकल्सने केला श्रीराम ग्रीन फायनान्सशी करार

प्रतिनिधी: ओडिसी इलेक्ट्रिक व्हेइकल्सने केला श्रीराम ग्रीन फायनान्सशी एक करार केला आहे. या भागीदारीचा उद्देश

उत्तन - विरार सी लिंकचा विस्तार वाढवण बंदरापर्यंत

- एमएमआरमधील प्रवासाला येणार वेग मुंबई : महाराष्ट्र शासनाने उत्तन–विरार सी लिंक आणि तिचा वाढवण बंदरापर्यंत

मुंबईतील कनेक्टिव्हिटीचे प्रकल्प युद्धपातळीवर पूर्ण करणार

आयआयएमयूएन आयोजित ‘युथ कनेक्ट’ कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन मुंबई : मुंबईतील वाहतूक व्यवस्था

आज मंत्रिमंडळाची साप्ताहिक बैठक नाही

मुंबई : दर मंगळवारी होणारी मंत्रिमंडळाची साप्ताहिक बैठक २५ नोव्हेंबर रोजी होणार नाही. स्थानिक स्वराज्य

आत्मसमर्पणासाठी नक्षलवाद्यांना हवाय १५ फेब्रुवारीपर्यंतचा वेळ

गडचिरोली (प्रतिनिधी): नक्षल संघटनेचा वरिष्ठ नेता भूपती आणि रुपेशचे शेकडो सहकाऱ्यांसह आत्मसमर्पण व त्यानंतर सहा

टीईटी पेपरफुटीच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश, पाच शिक्षकांसह एकूण १८ जणांना अटक

कोल्हापूर (प्रतिनिधी): राज्यभरात शनिवारी पार पडलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यात