Prakash Ambedkar : उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना स्वतःमध्ये बदल करण्याची गरज!

  54

बोचरी टीका करत प्रकाश आंबेडकरांनी मविआसोबत युतीच्या चर्चांना दिला पूर्णविराम


अकोला : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) गेल्या अनेक दिवसांपासून वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aghadi) महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) साथीने निवडणूक लढवणार अशा चर्चा होत्या. मात्र, मविआकडून समाधानकारक वागणूक न मिळाल्याने वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी वेगळ्या वाटा शोधल्या. मात्र, तरीही मविआकडून काही प्रस्ताव देत वंचितला सोबत घेण्याचे प्रयत्न सुरु होते. त्यामुळे वंचितच्या भूमिकेबाबत स्पष्टता नसताना आता स्वतः प्रकाश आंबेडकर यांनी मविआवर आरोप करत युतीच्या चर्चांना दिला पूर्णविराम दिला आहे.


उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांच्या पक्षाने स्वत:मध्ये बदल करण्याची गरज आहे, असं म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी जोरदार टीकास्त्र डागलं आहे. महाविकास आघाडीचा विषय आता संपला, प्रचाराला सुरुवात झाली आहे, असं म्हणत प्रकाश आंबेडरकांनी महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवण्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.


प्रकाश आंबेडकर म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने स्वतःमध्ये बदल केले नाही तर, त्यांची इतर राजकीय संघटना आणि पक्षांसारखीच वाताहत होणार आहे. लोकशाही आणि उमेदवारीचं सामाजिकीकरण होणं आवश्यक असल्यामुळेच वेगवेगळ्या समाज घटकातल्या लोकांना लोकसभेचे तिकीट दिलं आहे. यामुळे जातीवादी राजकारणाला चाप बसू शकेल. या निवडणुकीनंतर राज्यातील राजकारणातल्या बऱ्याच गोष्टींमध्ये बदल होतील, अशी शक्यताही आंबेडकरांनी व्यक्त केली आहे.


वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढणार असल्याची चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून होती. वंचित आणि मविआच्या अनेक बैठका, चर्चासत्रे निष्फळ ठरली. महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या फॉर्म्युल्यावर एकमत न झाल्याने वंचितने प्रस्ताव फेटाळला. वंचित आणि महाविकास आघाडीचा मार्ग पूर्णपणे वेगळा झाल्याचं प्रकाश आंबेडकरांनी आता जाहीर केलं आहे. आता प्रचाराला सुरुवात झाल्याने महाविकास आघाडीचा विषय संपला, असंही प्रकाश आंबेडकरांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.



प्रकाश आंबेडकरांना प्रेशर कुकर चिन्ह


अकोला लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणारे वंचित बहुजन आघाडीने अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना प्रेशर कुकर हे चिन्ह मिळालं आहे. अकोल्यात वंचित, भाजप आणि काँग्रेस अशी तिहेरी लढत पाहायला मिळणार आहे. अकोल्यात प्रकाश आंबेडकर यांची लढत ही भाजपचे अनुप धोत्रे आणि काँग्रेसचे अभय पाटील यांच्याशी होणार आहे.

Comments
Add Comment

अजित पवारांच्या जिल्ह्यातच लाडकी बहीण योजनेचे सर्वाधिक बोगस लाभार्थी

राज्य सरकारची 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेचा गैरफायदा घेतलेल्या बोगस लाभार्त्यांच्या संख्येत वाढ

चिपळूण पिंपळी येथे कोसळलेल्या पुलाची मंत्री उदय सामंत करणार पाहणी

शनिवारी रात्री चिपळूण तालुक्यात पूल दुर्घटना घडली. चिपळूण तालुक्यातील खडपोली एमआयडीसीकडे जाणारा महत्वाचा पूल

कल्याणमध्ये भीषण अपघात: ट्रकने दुचाकीस्वार महिलेला चिरडले, जागीच मृत्यू

ठाणे: कल्याण पश्चिम येथील निक्कीनगर परिसरात एका दुचाकीस्वार महिलेचा भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. आपल्या

बैलपोळाच्या दिवशी नदीमध्ये वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह गवसला

अकोला: मूर्तिजापूर तालुक्यातील एक युवक बैलपोळा सणाच्या दिवशी बैलांना धुण्यासाठी पेढी नदीवर गेला असता, अचानक पाय

छत्रपती संभाजीनगरला २४x७ शाश्वत पाणीपुरवठ्याचा मार्ग मोकळा; २६ द.ल.ली. जलशुद्धीकरण केंद्राचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहर पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून पुढील २५-३० वर्षे शहराच्या अपेक्षित

मराठा आरक्षणासाठी समितीचे नवीन अध्यक्ष!

मुंबई: भाजपच्या नेतृत्वाखालील 'महायुती' सरकारने जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची मराठा समाजाच्या