Wednesday, July 24, 2024
Homeताज्या घडामोडीतिकीट चेकिंग परिवार तर्फे सोमवारी हिंदु नववर्ष स्वागत व सन्मान सोहळ्याचे आयोजन

तिकीट चेकिंग परिवार तर्फे सोमवारी हिंदु नववर्ष स्वागत व सन्मान सोहळ्याचे आयोजन

नवी मुंबई(प्रतिनिधी) – सालाबाद प्रमाणे यंदाही तिकीट चेकिंग परिवार, मुंबई तर्फे गुढीपाडवा निमित्ताने हिंदू नवर्ष स्वागत निमित्ताने शोभा यात्रा व सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे तिकीट चेकिंग परिवार, मुंबई यांनी सांगितले.

सेंट्रल रेल्वे तिकीट चेकिग परिवार तर्फे वर्षभर रेल्वे कर्मचारी व अधिकारी यांच्या कल्याणासाठी विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते रेल्वे कर्मचारी आणि अधिकारी यांच्या गुणवंत विद्यार्थी आणि अधिकारी व कर्मचारी याचा सन्मान देखिल केला जातो. तसेच हिंदू धर्माचे नववर्ष म्हणजे गुढीाडव्यानिमित्त निमित्याने शोभायात्रा देखिल काढण्यात येते.

दरवर्षी प्रमाणे सोमवार २८एप्रिल २०२४ रोजी सकाळी १०:३० वा. स्थळ:- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ऑडीटोरिअम, मुंबई येथे गुढीपाडवा निमित्ताने हिंदू नवंवर्षाचे शोभायात्रा, (ऑडिटोरिअम ते महाप्रबंधक इमारत) सकाळी ११:०० वा – “सुरझंकार” ऑर्केस्ट्रा(हिंदू नववर्ष स्वागत संगीत कार्यक्रम) दुपारी १२:३० वा मान्यवरांचे स्वागत आणि सन्मान पुरस्कार २०२४ वितरण दुपारी १:३० वा – स्नेह भोजन आयोजित करण्यात आले आहे.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे श्री. डि.वाय. नाईक (PCCM) मध्य रेल्वे श्री. रजनीश कुमार गोयल (DRM) मुंबई तर सन्माननीय मान्यवर श्री. शशी भूषण (ADRM) मुंबई
श्री. प्रविंद्र वंजारी (SRDCM) मुंबई
डॉ. स्वप्निल नीला (CPRO) मध्य रेल्वे
श्री. बी. अरुण कुमार (SRDCM-WOKRS) मुंबई श्री. दिपक शर्मा (DCM) मुंबई
श्री. आर.एस. गोळे (ACM/TC) मुंबई
श्री. वाय.पी. शर्मा (DCTI) मुंबई हे उपस्थित राहणार आहेत. तसेच प्रा. डॉ. रविंद्र कुलकर्णी (कुलगुरु, मुंबई विद्यापीठ) श्री. प्रशांत फुलवणे (मराठी उद्योजक) वास्तू संकल्प ग्रुप,श्री. प्रकाश कनोजिया (DYCCM) मध्य रेल्वे,श्री. सुनील नारकर (DYCCM) कोकण रेल्वे उपस्थित राहणार असल्याचे समस्त तिकीट चेकिंग परिवार मुंबई यांनी सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -