Thursday, August 13, 2026

BMC NEWS : मुंबई-३ जलवाहिनीला ठाण्यातील तीन हात नाका परिसरात मोठी गळती; दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू

BMC NEWS : मुंबई-३ जलवाहिनीला ठाण्यातील तीन हात नाका परिसरात मोठी गळती; दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : ठाण्यातील तीन हात नाका परिसरात पूर्व द्रुतगती महामार्गालगत असलेल्या ३००० मिलीमीटर व्यासाच्या मुंबई-३जलवाहिनीला मोठ्या प्रमाणात गळती आढळून आली आहे. ही जलवाहिनी जमिनीखाली असून तिच्यावर आवरण करण्यात आले आहे. जलवाहिनी सुमारे ३ ते ४ मीटर खोलीवर असल्याने गळती दुरुस्तीचे काम तांत्रिकदृष्ट्या आव्हानात्मक आहे. या जलवाहिनीची दुरुस्ती करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

या जल वाहिनीची गळतीची माहिती मिळताच मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आपत्कालीन पातळीवर दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. जलवाहिनीपर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक उपाययोजना करून गळतीचा स्रोत शोधणे आणि जलवाहिनीची दुरुस्ती करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

३००० मिलीमीटर व्यासाची ही महत्त्वाची जलवाहिनी असल्याने गळतीमुळे मुंबई परिसरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी कार्यरत असून, दुरुस्तीचे काम वेगाने पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

जलवाहिनी जमिनीखाली मोठ्या खोलीवर आणि आवरणाखाली असल्याने दुरुस्ती पूर्ण करण्यासाठी आवश्यक वेळ लागू शकतो. गळती पूर्णपणे थांबवून जलवाहिनी सुरक्षितपणे पूर्ववत करण्यास महानगरपालिका प्रशासनाकडून प्राधान्य दिले जात आहे.तरी नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >