Shrikant Shinde : ठरलं! कल्याणमधून श्रीकांत शिंदे हेच महायुतीचे उमेदवार

देवेंद्र फडणवीसांनी केली घोषणा 


नागपूर : गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या कल्याणच्या (Kalyan) जागेवर अद्यापही महायुतीकडून (Mahayuti) उमेदवारीची घोषणा झाली नव्हती. भाजप व शिवसेना दोन्ही या जागेवर दावा करत असल्याने उमेदवार ठरत नव्हता. अखेर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी याबाबत मोठी घोषणा केली आहे. कल्याणच्या जागेवर श्रीकांत शिंदे हेच महायुतीचे उमेदवार असतील, असं फडणवीस म्हणाले आहेत. नागपूर येथे भाजपच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.


देवेंद्र फडणवीस म्हणाले, श्रीकांत शिंदे यांना भारतीय जनता पक्षाकडून विरोध नाही. श्रीकांत शिंदे हे कल्याणमधून महायुतीचे उमेदवार असणार आहेत. भारतीय जनता पार्टी त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहणार आहे. आम्ही पूर्ण ताकदीने त्यांचा प्रचार करणार आहोत. मागच्या निवडणुकीपेक्षाही अधिक मताधिक्याने त्यांचा विजय होईल. आम्ही महायुतीतील भाजपा, राष्ट्रवादी, शिवसेना, रासपा, रिपाई असे सर्व घटकपक्ष त्यांना निवडवून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहोत, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.


देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणेनंतर आता कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे विरुद्ध महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली दरेकर यांच्यात लढत होईल, हे स्पष्ट झाले आहे.

Comments
Add Comment

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी

जगभरात लोकप्रिय ‘रेडिओ सिलोन’ची शताब्दी

‘बिनाका गीतमाला’सह गाजलेले अनेक कार्यक्रम कोलंबो : भारतीय चित्रपट संगीताच्या इतिहासात अजरामर ठरलेल्या ‘रेडिओ

विरार-अलिबाग प्रकल्पाला येणार गती

हुडकोकडून २२ हजार ५०० कोटींचे कर्ज उपलब्ध मुंबई : विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या प्रकल्पाला आता गती

जागतिक बाजारपेठेत भारतीय डाळिंबांची मागणी

मुंबई : राज्यातील शेतकरी निर्यातक्षम फळे व भाजीपाला पिकवतात. या उत्पादनांना स्पर्धात्मक दर मिळावा म्हणून

भारताचे अंतराळवीर चंद्रावर जाणार

मुंबई : आर्यभट्ट या पहिल्या भारतीय उपग्रहाच्या प्रक्षेपणापासून ते चांद्रयान ३ मोहीमेपर्यंत भारताने उपग्रह,

३ इडियट्सचे १६ वर्षे: ५ कारणे ज्यामुळे राजकुमार हिरानींचा 'हा' चित्रपट आजही तितकाच ताजा वाटतो

मुंबई : राजकुमार हिरानी हे मोजक्या अशा फिल्ममेकर्सपैकी आहेत, ज्यांच्या कथा केवळ मनोरंजन करत नाहीत, तर दीर्घकाळ