चेन्नई : काहीच दिवसात देशभरात लोकसभा निवडणुकांना (Loksabha Election) सुरुवात होईल. निवडणुकीचे वारे वाहू लागताच नेते बाहेर पडतात. अनेक ठिकाणी प्रचार सुरु होतो. एरवी ज्या नेत्यांना भेटण्यासाठी तुम्हाला फेऱ्या माराव्या लागतात, ते स्वत:हून तुमच्या दारात येतात. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका उमेदवाराने प्रचारादरम्यान चक्क हाती वस्तरा घेत थेट मतदाराची दाढी करणं सुरू केला आहे.
तामिळनाडूच्या रामेश्वरमध्ये लोकसभेचा अपक्ष उमेदवार एका सलूनमध्ये न्हावी म्हणून लोकांचे केस कापताना आणि दाढी करताना दिसत आहे. व्हिडिओ मध्ये हा उमेदवार सलूनमध्ये आलेल्या लोकांची दाढी आणि कटिंग करत त्यांना आपल्याला मतदान करण्याचे आवाहन करताना दिसत आहे. तसेच उमेदवार चक्क हात जोडून त्या व्यक्तीला मतदान करण्याचे आवाहन करत आहे. अपक्ष उमेदवाराचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या व्हिडीओवर हजाराहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. त्यावर लोक भरभरुन प्रतिक्रिया देत आहेत. काही मनोरंजनात्मक प्रतिक्रिया देत आहेत तर काहीजण अशा उमेदवारांवर टीका करत आहेत.
प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…
उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…
डॉ. सर्वेश सुहास सोमण, samrajyainvestments@gmail.com शेअर बाजारात दीर्घकालीन गुंतवणूक ही नेहमीच फायद्याची ठरत आलेली आहे.…
महेश देशपांडे सरत्या आठवड्यामध्ये ऑटो जगताच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या बातम्या समोर आल्या. पहिली म्हणजे ग्रामीण…
- अल्पेश म्हात्रे, मुंबई डॉट कॉम मुंबईची दुसरी लाईफ लाईन असलेल्या बेस्ट उपक्रमाबद्दल गेले महिनाभर…
- सुनील जावडेकर सत्ताकारणाला समाजकारणाची जोड दिली तर एखादा राजकीय नेता त्याच्या आयुष्यात काय चमत्कार…