PM Narendra Modi: भाजपा सरकारने मुस्लिम कुटुंबांना संरक्षण दिले!

राजस्थानमध्ये पंतप्रधान मोदींचा एल्गार


जयपूर : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज राजस्थानमधील चुरु येथे निवडणूक रॅलीला संबोधित केले. 'काँग्रेसने जनतेसाठी नव्हे तर केवळ कुटुंबासाठी काम केले आहे आणि आम्ही सातत्याने लोकांसाठी काम करत आहोत', असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. तसेच आमच्या सरकारने प्रत्येक मुस्लिम कुटुंबाला संरक्षण दिल्याचा दावाही त्यांनी केला.


तिहेरी तलाकमुळे मुस्लिम कुटुंबांना भेडसावणाऱ्या समस्यांचा उल्लेख करत करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, तिहेरी तलाकवरील कायदा आमच्या मुस्लिम भगिनींना मदत करत आहे. माझ्या मुस्लिम माता-भगिनींनो हे समजून घ्या की, तिहेरी तलाकचा केवळ तुमच्या जीवाला धोका नव्हता तर माझ्या मुस्लिम मुलींच्या डोक्यावर टांगती तलवार होती. मोदींनी तुमचे रक्षण केले नाही तर मोदींनी प्रत्येक मुस्लिम कुटुंबांचे रक्षण केले आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.


तसेच मुस्लिम कुटुंबांतील वडिलांना एक भीती असायची अन त्यांना एक प्रश्न पडायचा की, मुलीचे लग्न झाल्यानंतर तिला दोन तीन मुले होतील, अन् त्यानंतर तिचा पती तिहेरी तलाक करून तिला घरी पाठवेल, मग मी त्या मुलीचा सांभाळ कसा करू? आई, मुलगी, भाऊ सगळेच काळजीत पडले होते. संपूर्ण परिवार तिहेरी तलाकच्या नावाखाली टांगत्या तलवारीखाली जगत होते. मोदींनी केवळ मुस्लिम भगिनींचेच नव्हे तर मुस्लिम कुटुंबांचे प्राणही वाचवले आहेत, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.


पंतप्रधान मोदी म्हणाले की, आतापर्यंत जे काही केले ते केवळ ट्रेलर आहे. आपल्याला खूप काही करायचे आहे, बरीच स्वप्ने बाकी आहेत. देशाला खूप पुढे न्यायचे आहे. भाजपा सर्वकाही करते. आम्ही जाहीरनामा देत नाही तर संकल्प पत्र जारी करतो. दिलेली बहुतांश आश्वासने आम्ही पूर्ण केली आहेत, असे पंतप्रधान मोदी यांनी वक्तव्य केले.

Comments
Add Comment

रोखीपेक्षा डिजिटलला पसंती

एका वर्षात २,३६० एटीएमना टाळे एटीएम बंद करण्यात खासगी बँका आघाडीवर नवी दिल्ली : डिजिटल पेमेंटच्या वाढत्या

सीमा सुरक्षा दल राबवणार 'ऑपरेशन सर्द हवा', घुसखोरांना दिसताक्षणी ठार करणार

श्रीनगर : सीमा सुरक्षा दल (Border Security Force / BSF) सीमेवर जम्मू काश्मीरमध्ये 'ऑपरेशन सर्द हवा' आणि राजस्थानमध्ये 'ऑपरेशन कोल्ड

आता शिक्षक करणार भटक्या कुत्र्यांची मोजणी

दिल्लीमधील सरकारने दिले आदेश नवी दिल्ली : भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवामुळे देशातील अनेक शहरांमधील लोक त्रस्त

काश्मिर खोरं गोठलं! तापमानात विक्रमी घसरण

श्रीनगर: हिवाळ्यात अनेकजण थंड हवेच्या ठिकाणी फिरायला जातात. गुलाबी थंडीचा अनुभव घेण्यासाठी डिसेंबर

गुजरात एटीएसची छापेमारी! राजस्थानातून जप्त केले २२ किलो ड्रग्ज

राजस्थान: राजस्थानमधून ड्रग्ज तस्करीबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राजस्थानमधील भिवाडी इथे गुजरात

नववर्षाच्या स्वागतासाठी सुरक्षा दलांचे 'कवच' तैनात!

काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट' घाटीत थरकाप उडवणारी थंडी, पण सुरक्षा यंत्रणा अलर्ट जम्मू-कश्मीर : नववर्षाच्या