Balbharti: वह्यांच्या कोऱ्या पानांवर बालभारतीचा तब्बल 'इतक्या' कोटींचा खर्च!

  75

या निर्णयाचा फायदा किती?


पुणे : यंदाच्या वर्षी राज्य सरकारने शालेय विद्यार्थ्यांच्या पाठीवरचं वाढणार ओझं कमी करण्यासाठी पाठ्यपुस्तकांमध्येच कोरी पाने जोडण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचे सुरुवातीला स्वागत करण्यात आले. मात्र तरीही विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या विषयासाठी स्वखर्चाच्या विविध वह्या बनवायला सांगितले गेल्यामुळे या निर्णयाचा खरंच फायदा होतं आहे की त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पाठीवरचं ओझं आणखी वाढलं आहे, असा प्रश्न उद्भवत आहे. शिवाय त्यासाठी तब्बल कोटींच्या घरात खर्च झाल्याचं समोर आले आहे.


यंदाच्या शैक्षणिक वर्षात वह्यांची कोरी पाने जोडलेली एकात्मिक पाठ्यपुस्तकांच्या निर्मितीसाठी राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाने (बालभारती) ७१ कोटी ४० लाख २६ हजार रुपये खर्च केले आहेत. राज्यातील दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना वह्यांची पाने जोडलेली चार भागांतील एकात्मिक पाठ्यपुस्तके शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून पथदर्शी स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली. यासाठी बालभारतीने तब्बल ७१ कोटी ४० लाख २६ हजार रुपयांचा खर्च केला.


खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेकडील अखर्चित १५ कोटी ४५ लाख सात हजार २३० रुपयांचा निधी वापरण्यास मंजुरी दिली आहे. याशिवाय शिक्षण विभागाकडील निधी बालभारतीला खर्चाची प्रतिपूर्ती म्हणून देण्यास सरकारने मान्यता दिली.

Comments
Add Comment

म्हाडा नाशिक मंडळातर्फे ४७८ सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर

ऑनलाईन अर्ज नोंदणी प्रक्रियेला सुरुवात मुंबई : नाशिकमध्ये घर शोधत असणाऱ्यांना आता सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.

भंडाऱ्यातलं जेवणं पडलं महागात, संपूर्ण गावाला विषबाधा!

नंदुरबार: नंदुरबार तालुक्यातील भिलाईपाडा या गावातून धक्कादायक बातमी समोर येत आहे. सध्या सणा सुदीचा काळ असून

दुबईतील साईभक्ताकडून तब्बल १ कोटी ५८ लाखांचे सुवर्ण दान; सोन्यात घडवली ॐ साई राम अक्षरे

अहिल्यानगर : शिर्डी साई बाबांना हैदराबादमधील आदीनारायण रेड्डी यांनी २००८ साली सुवर्ण सिंहासन दान स्वरूपात दिले

ओबीसींचे उपोषण मागे; राज्य सरकारकडून १४ पैकी १२ मागण्या मान्य

नागपूर : ओबीसी महासंघाकडून नागपुरातील संविधान चौकात साखळी उपोषण सुरू केले होते. मराठा आरक्षणाच्या निर्णयामुळे

मराठा समाजाचा जीआर सरसकटचा नाही

खरे कुणबी असतील त्यांना आरक्षण मिळेल: मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती मुंबई : जरांगे यांच्या आंदोलनानंतर सरकारने

गाईच्या दूध खरेदी दरात वाढ, आता ३५ रुपये प्रतिलिटर दर

सोलापूर : राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. खासगी आणि सहकारी दूध संघांनी गाईच्या