शेअर बाजार हे गुंतवणुकीचे असे क्षेत्र आहे जिथे कित्येक गुंतवणूकदारांनी अत्यंत उत्तम नियोजन करून अतिशय चांगला फायदा मिळविलेला आहे. आपण शेअर बाजारात एखादा शेअर खरेदी केल्यावर त्यात वाढ झाली आणि त्यानंतर वाढलेल्या किमतीला जर आपण तो शेअर विकला, तर आपणाला फायदा होत असतो. उलट जर खरेदी केलेल्या किमतीपेक्षा जर कमी किमतीला शेअर विकला तर आपणास तोटा होत असतो. शेअर बाजारात या खरेदी आणि विक्रीत अत्यंत महत्त्वाची भूमिका असते तो म्हणजे “स्टॉपलॉस”.
“स्टॉपलॉस” या शब्दातच त्याचा अर्थ दडलेला आहे. सरळ भाषेत बोलायचे झाल्यास नुकसान थांबविणे किंवा टेक्निकल भाषेत लॉस बुक करणे असा याचा अर्थ होतो. “स्टॉपलॉस” हा टेक्निकल अॅनालिसिस करून ठरवला जातो. “स्टॉपलॉस” म्हणजे एखाद्या शेअर्सची अशी पातळी की, जर त्या पातळीच्या किंवा किमतीच्या खाली जर तो शेअर आला तर त्या शेअरमध्ये आणखी मोठी घसरण होऊ शकते आणि जर त्या पातळीच्या खाली आल्यावर आपण “लॉस बुक” केला नाही तर परिणामी आपण केलेल्या त्या गुंतवणुकीत आपले नुकसान आणखी वाढू शकते. बऱ्याचदा अनेक नावे आणि जुने गुंतवणूकदार स्टॉपलॉसचा वापर करताना दिसत नाहीत आणि त्यामुळे त्यांना होत असलेल्या नुकसानीपेक्षा अधिक नुकसान सहन करावे लागते. कित्येकदा अनेक गुंतवणूकदार टेक्निकलदृष्ट्या स्टॉपलॉस काय येतोय हे न पाहता आपल्या मनानेच “स्टॉपलॉस” ठेवतात आणि नुकसान करून घेतात. या उलट चतुर गुंतवणूकदार परिपूर्ण अभ्यास, संयम, योग्य नियोजन आणि “स्टॉपलॉस” चा योग्य वापर करून शून्यातून आपले विश्व उभे करतात. त्यामुळे माझ्या मते “स्टॉपलॉस” हा शेअर बाजारात खरेदी विक्री करीत असताना खऱ्या अर्थाने किंग मेकरची भूमिका बजावतो. “स्टॉपलॉस” लावण्याच्या मुख्यत: दोन पद्धती आहेत. एक मी वर सांगितल्याप्रमाणे शेअर खरेदीनंतर किंमत खाली यायला लागल्यावर नुकसान वाढू नये म्हणून लावतात. तर दुसरा असतो तो फायद्याचा “स्टॉपलॉस” ज्यामध्ये आपण नफ्यामध्ये आल्यावर तो नफा हातातून जाऊ नये यासाठी तो लावला जातो. यालाच टेक्निकल भाषेत “ट्रेलिंग स्टॉपलॉस”असे म्हणतात. निर्देशांकाची दिशा ही तेजीची असून अल्पमुदतीच्या चार्टनुसार निर्देशांक निफ्टीची २२००० ही अत्यंत महत्त्वाची खरेदीची पातळी आहे. अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या या पातळी खाली निर्देशांक आल्यास निर्देशांकात आणखी घसरण होवू शकेल. पुढील काळाचा विचार करता ग्रासीम, डी मार्ट, मारूती, इंडिगो यासह अनेक शेअर्सची दिशा टेक्निकल अॅनालीसीसनुसार तेजीची आहे.
मी माझ्या १७ जुलै २०२३ च्या लेखात “झोमॅटो” या शेअरने ८० ही अत्यंत महत्वाची पातळी तोडत तेजीचे संकेत दिलेले आहेत हे सांगितलेले होते. त्यामुळे मध्यम मुदतीच्या चार्टनुसार तेजी सांगणारी विशेष रचना तयार झालेली असून ८२.५०रुपये किमतीला असणाऱ्या या शेअरमध्ये अल्पमुदतीसाठी तेजीचा व्यवहार केल्यास हा चांगली वाढ दाखविणे अपेक्षित आहे, हे सांगितलेले होते. मी सांगितल्यापासून या शेअरने १८९ हा उच्चांक नोंदविलेला आहे. टक्केवारीत पाहायचे झाल्यास या शेअरमध्ये १०० पेक्षा जास्त टक्क्यांची महावाढ झालेली आहे.
(सूचना: लेखकाची तसेच त्यांच्या जवळच्या नातेवाइकांची लेखात सुचवित असलेल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणतीही गुंतवणूक नाही किंवा सुचविलेल्या कंपन्यांशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून कंपनीकडून कोणतेही मानधन किंवा भेटवस्तू घेतलेली नाही.)
samrajyainvestments@gmail.com
पूजा काळे सृष्टीचे तत्त्व सांभाळा, नेहमीची येतो उन्हाळा. वर्षभरात तीन ऋतूंच्या तीन तऱ्हा सांभाळताना होणारा…
पुणे : काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात अध्यक्ष बदलला आहे. हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष झाले आहेत.…
डॉ. वीणा सानेकर भाषा हा शिक्षणातील पायाभूत घटक आहे. ती माणसाच्या अस्तित्वाची ओळख असल्यामुळे शिक्षणातील…
अर्चना सोंडे जगात ज्या काही दुर्मीळ आदिवासी जमाती आहेत. ज्यांचे पृथ्वीवरील अस्तित्व संपल्यात जमा झाले…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण सप्तमी शके १९४७. चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा. योग सिद्ध. चंद्र राशी…
मुंबई(ज्ञानेश सावंत): रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा संघ पावसामुळे मागच्या सामन्यात पंजाब कडून दारुण पराभूत झाला. सुरुवातीचे…