Petrol-Diesel Price Hike: राज्यात पेट्रोल-डिझेल महागले!

इंधनावर नेमका किती कर; जाणून घ्या सविस्तर


मुंबई : आजपासून आर्थिक वर्षाला सुरवात झाली आहे. नव्या आर्थिक वर्षापासून एलपीजी गॅस सिलेंडरचे दर, टॅक्स नियमात बदल, फास्टॅग यांसारख्या नियमात बदल लागू केले आहेत. काही गोष्टींमुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळला आहे तर काही गोष्टींत महागाईच्या झळा सोसाव्या लागणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात किचिंत बदल झाल्याचे पाहायला मिळाले आहे.


पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने चढ-उतार होताना दिसून येतो. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात २ रुपयांनी कपात केल्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दिलासा मिळाला होता. मात्र सरकारी कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलच्या नव्या किंमती जाहीर केल्या आहेत. महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेल महाग झाले आहे. महाराष्ट्रात पेट्रोल ६५ पैशांनी तर डिझेल ६३ पैशांनी महाग झाले आहे. तर मध्य प्रदेशात पेट्रोल ३१ पैसे तर डिझेल २८ पैशांनी महागले आहे. हिमाचल प्रदेशात पेट्रोल २३ पैसे तर डिझेल २२ पैशांनी महागले आहे.


जाणून घ्या महाराष्ट्र आणि देशाच्या मुख्य शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर




  • आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईत आज पेट्रोल दर प्रतिलिटर १०४.२१ रुपये तर डिझेलचा दर ९२.१५ रुपये प्रति लिटरने विकले जाणार आहे.

  • पुण्यात पेट्रोलचा दर १०३.८३ रुपये तर डिझेलचा दर ९०.३७ रुपये आहे.

  • नाशिकमध्ये पेट्रोल १०४.९१ रुपये प्रतिलिटरने विकले जात आहे. डिझेलचे दर ९१ ते ४१ रुपये प्रति लिटर आहे.

  • नागपुरात पेट्रोलचा दर १०३.९८ रुपये तर डिझेलचा दर ९०.५४ रुपये प्रतिलिटर आहे.

  • छत्रपती संभाजीनगरात पेट्रोल १०६ ते ७८ रुपयांना विकले गेले असते. डिझेल ९०.५४ रुपये प्रति लीटर दराने उपलब्ध आहे.

  • नवी दिल्लीत पेट्रोलचा दर ९४.७२ रुपये प्रतिलिटर आहे. डिझेलचा दर ८७.६२ रुपये आहे.

  • कोलकात्यात पेट्रोलचा दर प्रतिलिटर १०३.९४ रुपये आणि डिझेलचा दर ९०.७६ रुपये आहे.

  • चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर १००.७५ रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर ९२.३४ रुपये प्रति लिटर आहे.

Comments
Add Comment

Chhatrapati Sambhajinagar Suicide : "तुमच्या पुढच्या सात पिढ्या यातना भोगतील..." मृत आईच्या त्या शेवटच्या शापाने उघडकीस आले कौटुंबिक वादाचे सत्य?

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलेल्या एका अत्यंत दुर्दैवी आणि हादरवून टाकणाऱ्या घटनेने संपूर्ण

Pune Accident : क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं! पुण्यात बसमधून खाली पडल्याने तरुणीचा दुर्दैवी अंत; 'त्या' एका चुकीमुळे गेला जीव?

पुणे : पुण्यातील सिंहगड रस्त्यावर सोमवारी सकाळी भीषण अपघात झाला. धावत्या पीएमपीएमएल बसमधून अचानक तोल जाऊन खाली

Chhatrapati Sambhaji : देवा...किती किळसवाणा प्रकार! पप्पांनी कचोरी आणली अन् त्यात उंदराच्या लेंड्या; ५ पैकी २ कचोऱ्या मुलांनी खाल्ल्याने नागरिकांत संताप

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधील (Chhatrapati Sambhajinagar) वैजापूर शहरात (Vaijapur Area) अन्नाची अवहेलना आणि ग्राहकांच्या

PUC Certificate : सर्व वाहनचालकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! PUC साठी आता मोजावे लागणार 'इतके' रुपये; जाणून घ्या सविस्तर

मुंबई :  महाराष्ट्र परिवहन विभागाने राज्यातील वाहनांच्या प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र म्हणजेच PUC

Maharashtra Weather : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; घाटमाथ्यासह विदर्भात जोरदार सरींचा अंदाज

मुंबई : महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा एकदा बदल होण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार

Nagpur Gas Leak : नागपुरात मध्यरात्री खळबळ! गाढ झोपेत अचानक श्वास गुदमरला, गॅस गळतीने 40 जण रुग्णालयात

नागपूर : नागपूरमधील गोधणी परिसरात मध्यरात्री जलशुद्धीकरण प्रकल्पातून क्लोरिन वायूची गळती झाल्याने मोठी खळबळ