रायगडमधील अलिबाग, नागाव, वरसोली, काशीद, श्रीवर्धन, दिवेआगर समुद्रकिनारे गजबजले

पर्यटकांचे लोंढे रायगडात दाखल; पर्यटकांनी परिसर हाऊसफुल्ल ; अर्थकारणाला गती


अलिबाग : मुलांच्या दहावी, बारावीच्या परीक्षा संपल्यानंतर पर्यटकांचे लोंढे पुन्हा एकदा रायगडात दाखल होऊ लागले आहेत. त्यामुळे येथील समुद्रकिनारे पर्यटकांनी हाऊसफुल्ल झाले आहेत. अलिबाग, नागाव, वरसोली, काशीद, श्रीवर्धन, दिवेआगर या समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. पर्यटक आल्याने परिसरातील हॉटेल, लॉजेस, रिसॉर्ट व्यावसायिकांना आता सुगीचे दिवस आल्याचे दिसत आहे.


रायगड जिल्हा हा पर्यटन जिल्हा असून येथील निसर्गरम्य समुद्रकिनारे, ऐतिहासिक वास्तू, खाण्यास ताज्या मच्छीमुळे पर्यटक पर्यटनास येत असतात. सलग पडलेल्या सुट्ट्यांमुळे अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन तालुक्यात पर्यटक समुद्रकिनाऱ्यांचा आनंद लुटत आहेत. मुंबईपासून जवळ असल्याने रायगडला पर्यटकांची पहिली पसंती असते. मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, पुणे, पश्चिम महाराष्ट्र या भागांतून पर्यटक पर्यटनास आले आहेत. जिल्ह्यातील हॉटेल, रिसॉर्ट, लॉजेस हाऊसफुल्ल झाले आहेत. जिल्ह्यातील नागाव, काशीद, वरसोली या समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांसाठी बोटिंग, घोडागाडी सवारी यांसारख्या सुविधा असल्यामुळे किनाऱ्यावर पर्यटक याचा लाभ घेत आहेत.


पर्यटकांमुळे हॉटेल, रिसॉर्ट यांच्यासोबत घरगुती लॉजेस चालवणाऱ्या स्थानिकांनाही आर्थिक फायदा होत आहे. तसेच, पर्यटनास आलेले पर्यटक परत माघारी फिरताना समुद्र किनाऱ्यालगतच असलेल्या स्टॅलमधून विविध प्रकारची लोणची, चिंचेचे गोळे, वाल, विविध प्रकारचे पापड, पांढरा कांदा या वस्तूंची खरेदी करतात.



हॉटेल, लॉज, रिसॉर्ट व्यावसायिकांना फायदा


अलिबागमध्ये पर्यटकांची जत्रा भरल्याचे चित्र समुद्रावर दिसत होते. समुद्रस्नानाचा आनंद बच्चे कंपनीसह मोठेही घेत होते. उंट, घोडा, तसेच एटीव्ही बाईकचा आनंद लुटताना पर्यटकांची धूम मस्ती सुरू होती. पर्यटक पुन्हा अलिबागेत येऊ लागल्याने स्थानिक व्यावसायिक आनंदीत आहेत. पर्यटक मोठ्या संख्येने येऊ लागल्याने हॉटेल, लॉज, रिसॉर्ट व्यावसायिक याना आर्थिक फायदा होऊ लागला आहे.



व्यवसायांना मिळणार उभारी


घोडागाडी, एटीव्ही बाईकवर स्वार होऊन समुद्रकिनाऱ्यांचा आनंद लुटताना पर्यटक दिसत आहेत. समुद्रकिनाऱ्यावरील स्टॉलवर वडापाव, भजी, पॅटीस असे वेगवेगळे प्रकारचे खाद्य पदार्थ विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. आर्थिक मंदीमुळे झालेल्या लहान-मोठ्या व्यवसायाला पुन्हा उभारी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.



Comments
Add Comment

मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू

रायगड : मुंबई-पुणे महामार्गावर बुधवारी सकाळी भीषण अपघात घडून तिघांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत एकूण पाच

आयपीएल 2026 : विराट कोहली बंगळूरुमध्ये दाखल

बंगळुरु : रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचा माजी कर्णधार आणि महान क्रिकेटपटू विराट कोहली आयपीएल २०२६ साठी संघात सामील

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी घेतले छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन

पुणे : छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३३७ व्या बलिदान स्मरणदिनानिमित्त राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि पुणे

सातारा येथे २२ मार्चला चतुर्थ ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद'

मंदिर-संस्कृतीच्या रक्षणार्थ एक हजारांहून अधिक मंदिर प्रतिनिधींची उपस्थिती सातारा : लाखो वर्षांपासून हिंदु

मराठी कलाविश्वाचा सन्मान सोहळा; दिमाखात रंगला ‘चिरायू २०२६’

मुंबई : साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी आपण सगळेच सज्ज झाले आहोत.

Gyan Bharatam project : ज्ञानभारतम् प्रकल्पाची सुरुवात; देशव्यापी हस्तलिखित सर्वेक्षण मोहिमेला प्रारंभ

मुंबई : भारताच्या समृद्ध ज्ञानपरंपरेचा अमूल्य ठेवा असलेल्या हस्तलिखितांचे जतन, संवर्धन आणि प्रसार करण्यासाठी