संशोधकांनी लावला नवा शोध; पाणी प्या व बाटलीही खा

लंडन : देशात आढळणाऱ्या एकूण कचऱ्यामध्ये सर्वाधिक कचरा हा प्लॅस्टिकचा आहे. या प्लॅस्टिकचा कचऱ्यामुळे देशावरील संकट वाढवले आहे. अनेक ठिकाणी प्लॅस्टिकविरोधी कारवाई आणि जनजागृती केली जाते. अशातच लंडनमधील संशोधकांनी प्रदूषण कमी करण्यास हातभार लागेल असा नवा शोध लावला आहे. अर्थात अशा नवनवीन संशोधनांमुळे मानवी जीवन अधिक सुखकारक होते. काही शोध मानवी इतिहास बदलण्यास समर्थ असतात तर काही शोध दिशा बदलणारे असतात.


संशोधकांनी पाणी प्यायल्यानंतर ते ज्यात भरले आहे ती बाटली अथवा फुगा खाताही येणार असा नवा शोध लावला आहे. पाणी पिवून झाल्यावर ते खायचा नसल्यास फेकायचा असेल तरीही काही अडचण नाही. तो सहज डिग्रेड होऊ शकणार आहे आणि त्याच्यामुळे कोणतेही प्रदूषण होणार नाही, असे संशोधकांनी सांगितले.


'ओहो' नावाची ही फुगेवजा बाटली रॉयल कॉलेज ऑफ आर्टस आणि इंपेरियल कॉलेज लंडन यांच्या संशोधकांनी तयार केली असून त्याचे प्रमुख आहेत रोडिग्रो गार्सिया गोंगालेज. जिलेटिन पासून ही बाटली बनविली गेली आहे. केवळ पाणीच नाही तर कोणताही द्रव पदार्थ त्यात भरता येणार आहेत असा संशोधकांचा दावा आहे.


विशेष म्हणजे या बॉटल्सचा शोध दहा वर्षांपूर्वी २०१४ मध्ये लावण्यात आला होता. भारतातही सध्या या बॉटल्स उपलब्ध असून अॅमेझॉनसारख्या वेबसाईट्सवरुन तुम्ही त्या ऑनलाईन मागवू शकता.

 
Comments
Add Comment

'अतिरेक्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानशी मैत्री होणार नाही'

जम्मू : अतिरेक्यांना आश्रय देणे थांबवून आतंकवाद संपवला तरच पाकिस्तानशी मैत्रीची चर्चा होईल. मात्र दहशतवाद

भारतात चॅट जीपीटीपेक्षा लोकप्रिय झाले इंडियन ऑइल कंपनीचे अ‍ॅप

नवी दिल्ली : गूगल प्ले स्टोअर आणि अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअर या दोन प्लॅटफॉर्मवर सध्या चॅट जीपीटीपेक्षा इंडियन ऑइल

उरीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न उधळला, पाकिस्तानी दहशतवादी ठार

बारामुल्ला : भारतीय सैन्याने जम्मू काश्मीरमधील उरी सेक्टरमधील बुछारमधून घुसखोरी करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न

Air India Airlines : युद्धाच्या पार्श्वभूमीवर देखील एअर इंडियाची ७२ उड्डाणे सुरू; अतिरिक्त सेवांची तयारी

मध्य पूर्वेमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर रविवारी एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेस या विमान कंपन्या

एलपीजी पुरवठ्याबाबत महत्त्वाचा बदल, 'या' कुटुंबांना घरगुती एलपीजी सिलिंडर दिले जाणार नाहीत

नवी दिल्ली: पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने घरगुती स्वयंपाकाच्या गॅस (एलपीजी) पुरवठ्याबाबत एक मोठा आणि

Google's doodle : गुगलचं विशेष ‘पाय डे’ डूडल; गणितातील प्रसिद्ध स्थिरांकाला गुगलकडून अनोखा सलाम

मुंबई : गुगलने जगभरातील गणितप्रेमींसाठी १४ मार्च २०२६ रोजी खास डूडल सादर करून ‘पाय डे’ साजरा केला. या विशेष