Cyber Crime: सावधान! +92 या क्रमांकांपासून सुरु होणारे कॉल घेऊ नका, सरकारने का दिला इशारा

मुंबई : सध्याच्या घडीला मोबाईल वापरणं मुलभूत गरज बनली आहे. आजकाल सर्वच काम मोबाईल वर होऊन जातात. मोबाईलच्या फायद्यांसह अनेक दुरुपयोगही होत आहेत. मोबाईल्समुळे सायबर क्राईम अधिक प्रमाणात वाढत असल्याने मोबाईल वापरकर्त्यांना दुरसंचार विभागाने सावधानतेचा इशारा दिला आहे. व्हॉट्सअॅपवर +92 सारख्या परदेशी मूळ क्रमांकावरुन कॉल येत असतील तर ते कॉल उचलू नका. या नंबरवरुन येणाऱ्या कॉलमुळे मोठ्या प्रमाणात फसवणूक होत आहे, असे दुरसंचार विभागाने म्हटले.


+92 या नंबरवरुन कॉल आला आणि सरकारी अधिकारी असल्याचे सांगत असल्यास तरी देखील कोणतीही माहिती देऊ नका. टेलिकॉम विभागांची तोतयागिरी करणारे कॉलर मोबाईल वापरकर्त्यांना धमकावत आहेत. त्यांचे नंबर डिस्कनेक्ट केले जातील किंवा काही बेकायदेशीर कामांमध्ये त्यांच्या नंबरचा गैरवापर केला जात आहे. असे सांगून हे सायबर गुन्हेगार निष्पाप नागरिकांना धमकावत आहेत.


दूरसंचार विभाग आपल्या वतीने कोणालाही असे कॉल करण्यासाठी सहमती दिली नाही. त्यांनी लोकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे आणि कोणत्याही गोष्टी शेअर न करण्यास सांगितले. असे कॉल प्राप्त करणाऱ्या लोकांची प्रकरणे वाढत आहेत. सायबर गुन्हेगार आर्थिक फसवणूक करण्यासाठी या कॉलद्वारे लोकांना धमकावून वैयक्तिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे दुरसंचार विभागाने लोकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. असे कॉल आल्यास कुठलीही माहिती देऊ नका. सायबर क्राइम हेल्पलाइन नंबर 1930 किंवा www.cybercrime.gov.in वर तक्रार करण्याचा सल्ला दुरसंचार विभागाने दिला आहे.

Comments
Add Comment

किया इंडियाने कारची वॉरंटी ७ वर्षांपर्यंत वाढवली

मुंबई:किया इंडिया मास प्रीमियम कारमेकरने आपला एक्‍स्‍टेण्‍डेड वॉरंटी प्रोग्राम वेईकल डिलिव्‍हरीच्‍या

मराठा सेवा संघाच्या नकुल भोईरची हत्या, पत्नीला अटक

पुणे: पुणे जिल्ह्यातील चिंचवड परिसरात मध्यरात्री घडलेल्या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. मराठा सेवा संघ आणि

८५ वर्षीय आईला खांद्यावर घेऊन कर्नाटकातील विठुभक्ताची पंढरपूर वारी

कर्नाटकातील आधुनिक श्रावणबाळ बेळगाव : पौराणिक कथेप्रमाणे कर्नाटकातही आधुनिक श्रावणबाळ असल्याचं दिसून आलं आहे.

पुणेकरांसाठी पुन्हा त्रासदायक बातमी; भिडे पूल पुन्हा बंद, नववर्षातच खुला होण्याची शक्यता

पुणे : पुणेकरांच्या दैनंदिन प्रवासातील एक महत्त्वाचा दुवा असलेला बाबाराव भिडे पूल पुन्हा एकदा वाहतुकीसाठी बंद

पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन ब्लॉक

मुंबई : पश्चिम रेल्वेवर दि. २५ ते २६ ऑक्टोबरच्या मध्यरात्री वसई रोड आणि भाईंदर स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर

सोन्याचा हार कचऱ्यात गेला; कचऱ्याच्या ढिगाऱ्यात शोधाशोध झाली आणि अखेर...

कल्याण : सोन्याचे दर दिवसेंदिवस वाढत असून सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. अशा काळात सोनं जपून ठेवणं