Ramtek News : काँग्रेस नेत्यांनी दबाव टाकल्याचा आरोप करत किशोर गजभिये अपक्ष लढणार

रामटेकमध्ये काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का


रामटेक : रामटेक लोकसभा मतदारसंघातील (Ramtek Loksabha) काँग्रेसच्या (Congress) अडचणी थांबत नसल्याचे चित्र आहे. काँग्रेसने रश्मी बर्वे (Rashmi Barve) यांना उमेदवारी जाहीर केली मात्र त्यांचं जात प्रमाणतपत्र पडताळणीत अपात्र ठरल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला. हा काँग्रेससाठी एक धक्का होता. त्यानंतर आता रामटेकमध्येच काँग्रेसला दुसरा मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे नेते असलेले किशोर गजभिये (Kishor Gajbhiye) यांनी आपण याच मतदारसंघातून अपक्ष लढणार असल्याचं तसेच काँग्रेसच्या सदस्यत्वाचा लवकरच राजीनामा देणार असल्याचं म्हटलं आहे.


माध्यमांसमोर आपली भूमिका स्पष्ट करताना किशोर गजभिये म्हणाले, "रामटेक लोकसभा मतदारसंघातून मी माझा उमेदवारी अर्ज भरला होता. हा अर्ज आधिक स्विकृत झालेला आहे. यामध्ये निवडणूक चिन्हही मला मिळालं आहे. जे मुक्त चिन्ह आहेत त्यातील प्रेशर कुकर हे चिन्ह मला मिळालं आहे."


मला जिंकायचं आहे त्यामुळं कोणाला फटका बसतोय याची चिंता मी कशाला करु? मी सध्या काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिलेला नाही. पण लवकरच देणार आहे. मी उमेदवारी मागे घ्यावी यासाठी माझ्यावर दबाव होताच, त्यासाठी लोकांनी प्रयत्नही करुन पाहिले. पण यावर मी आत्ता जास्त भाष्य करणार नाही, असंही यावेळी गजभिये यांनी सांगितलं.



गजभिये यांनी का केली बंडखोरी?


किशोर गजभिये यांनी काँग्रेसकडे उमेदवारी मागितली होती. मात्र, माजी मंत्री सुनील केदार यांनी त्यांच्या नावाला कडाडून विरोध दर्शवला होता. त्यांनी रश्मी बर्वे यांच्या नावाचा आग्रह धरला होता. केदारांचा हट्ट काँग्रेसच्या नेत्यांनी पुरवल्याने गजभिये यांनी बंडखोरी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी वंचित बहुजन विकास आघाडीच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला.


वंचित बहुजन आघाडीने त्यांना उमेदवारी देण्याचं जाहीरसुद्धा केलं होतं. पण अचानक वंचितच्या वतीनं भाजपचे माजी जिल्हा परिषद सदस्य शंकर चहांदे यांनीही उमेदवारी दाखल केली. त्यामुळे वंचितकडूनही गजभिये यांना डावलण्यात आलं. त्यामुळं त्यांनी अपक्ष अर्ज दाखल केला.


२०१९ च्या निवडणुकीत काँग्रेसने रामटेकमधून किशोर गजभिये यांना उमेदवारी दिली होती. त्यावेळी सुनील केदार आणि माजी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी त्यांच्या नावाला उघडपणे विरोध केला होता.

Comments
Add Comment

रिद्धपूर येथे जागतिक कीर्तीचे विद्यापीठ साकारणार: फडणवीस

नाशिक : रिद्धपूर या तीर्थक्षेत्राने मराठी भाषा जीवंत ठेवण्याचे काम केले असून तेथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापन

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या व्यासपीठावर मनोज जरांगे येणार का?

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे

Sanjay Shirsat : संजय शिरसाटांच्या मनात नेमकं चाललंय काय? निवृत्ती की राजकीय खेळी?

शिंदे गटाच्या आमदाराच्या निर्णयामागे कुटुंबातील 'नवे नेतृत्व' आणण्याची खेळी? मुंबई : राज्याचे समाजकल्याण

मंत्री नितीन गडकरी यांच्यासमोर दोन महिला अधिकाऱ्यांमध्ये खुर्चीवरून भांडण! नागपूरचे पोस्टमास्टर जनरलपद नेमके कुणाकडे?

एकीने दुसरीच्या अंगावर पाणी ओतलं, चिमटाही काढला नागपूर : नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या

फलटणच्या महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाला नवं वळण, प्रशांतच्या बहिणीचा मोठा खुलासा

सातारा : साताऱ्यातील फलटण येथे महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याच्या प्रकरणाला आता धक्कादायक वळण मिळालं आहे. या

फलटणमध्ये महिला डॉक्टरची आत्महत्या, निलंबित PSI बदनेचा शोध सुरू

सातारा : सातारा जिल्हातील फलटण मधील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येनंतर पोलिसांना २४ तासांच्या आत आरोपी प्रशांत