Narendra Modi : दुसऱ्यांना भीती घालणे आणि धमकावणे ही काँग्रेसची जुनी संस्कृती!

६०० वकिलांच्या 'त्या' पत्रावरुन पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर साधला निशाणा


नवी दिल्ली : काही विशिष्ट लोकांचा समूह न्यायव्यवस्थेवर दबाव आणण्याचा, न्यायालयीन प्रक्रियेवर प्रभाव टाकण्याचा आणि विचित्र तर्क आणि राजकीय अजेंड्याच्या आधारावर न्यायालयांची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप करणारे पत्र ज्येष्ठ विधिज्ञ हरिश साळवे (Harish Salve) यांच्यासह देशातील ६०० वकिलांनी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड (Chief Justice DY Chandrachud) यांच्याकडे सोपवले. यात उल्लेख केलेल्या समूहावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी काँग्रेस पक्षाला (Congress Party) लक्ष्य केलं आहे.


'हा गट एखाद्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करतो आणि नंतर त्याचाच बचाव करतो. हा गट न्यायालयाच्या चांगल्या भूतकाळाच्या आणि सुवर्णकाळाच्या खोट्या कथा रचतो आणि वर्तमानात घडणाऱ्या घटनांशी तुलना करतो. त्यांच्या टिप्पण्यांचा उद्देश न्यायालयांवर प्रभाव पाडणे आणि राजकीय फायद्यासाठी त्यांना अस्वस्थ करणे हा आहे. निर्णय त्यांच्या बाजूने आला नाही, तर न्यायालयावर टीका केली जाते' असा दावा या पत्रात करण्यात आला आहे.


या पत्रानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट केले की, 'दुसऱ्यांना भीती घालणे आणि धमकावणे, ही काँग्रेसची जुनी संस्कृती आहे. ५ दशकांपूर्वी त्यांनी प्रतिबद्ध न्यायपालिकेची मागणी केली होती. ते निर्लज्जपणे स्वतःच्या स्वार्थासाठी इतरांकडून वचनबद्धता घेतात, देशाप्रती कोणतीही वचनबद्धता ठेवत नाहीत. १४० कोटी भारतीय त्यांना नाकारत आहेत, यात काहीच आश्चर्य नाही,' अशी टीका पंतप्रधान मोदी यांनी केली.

Comments
Add Comment

छत्तीसगडला १४,२६० कोटींचे बुस्टर डोस!

पंतप्रधान मोदींकडून पायाभूत सुविधा, आरोग्य आणि ऊर्जेच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे भूमिपूजन नवी दिल्ली:

महिला संघाने विश्वचषक जिंकल्यास गावस्कर करणार हे विशेष काम

नवी दिल्ली : भारतीय महिला क्रिकेट संघ वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात दिमाखात दाखल झाला आहे. भारतीय महिला संघ आता

उद्यापासून बदलणार आधार कार्डबाबतचे नियम

नवी दिल्ली : युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया १ नोव्हेंबर २०२५ पासून आधार अपडेटच्या नियमांमध्ये मोठे बदल

'शीशमहल' वाद आता पंजाबमध्ये!

केजरीवाल यांना 'चंदीगढचा आलिशान बंगला'! भाजपचा थेट आरोप; 'आप'ने फेक न्यूज म्हणून फेटाळले नवी दिल्ली/चंदीगढ:

फेब्रुवारी २०२६ ला विशाखापट्टणममध्ये भारतीय नौदलाचा आंतरराष्ट्रीय फ्लीट रिव्ह्यू सोहळा

नवी दिल्ली : भारतीय नौदल इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा गाठत, फेब्रुवारी २०२६ मध्ये आंध्र प्रदेशातील

देशभरात साजरा करणार ‘आदिवासी गौरव वर्ष पंधरवडा’

नवी दिल्ली : आदिवासी व्यवहार मंत्रालयाच्या अंतर्गत असणाऱ्या राष्ट्रीय आदिवासी विद्यार्थी शिक्षण संस्थेच्या