काँग्रेसचे अध्यक्ष माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांचा भाजपात प्रवेश

गडचिरोली : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना गडचिरोतील काँग्रेसच्या एका बड्या नेत्याने भाजपामध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेसला गेल्या काही दिवसांपासून एका मागे एक धक्के बसत असल्यामुळे काँग्रेसचे नेते महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे महासचिव तथा आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला आहे. आज दुपारी आपल्या पदाचा राजीनामा देत त्यांनी नुकताच सायंकाळी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. याचा काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

दरम्यान, आज दुपारी डॉ. नामदेव उसेंडी यांनी निवासस्थानी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत, ''मी महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष या पदावर कार्यरत होतो. नेमणूकीनंतर संपूर्ण महाराष्ट्रात आदिवासी काँग्रेस पक्षाचा संघटन करण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसच्या माध्यमातून आदिवासींना न्याय मिळेल अशी अपेक्षा होती. मी गडचिरोली जिल्ह्याचा स्थानिक उमेदवार म्हणून पक्षाकडे गडचिरोली - चिमुर या लोकसभा क्षेत्राची उमेदवारी मागितली होती. स्थानिक व राज्य पातळीवरचं माझं काम पाहून उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा होती. परंतू स्थानिक व राज्य पातळीच्या काँग्रेसच्या नेतृत्वाने षडयंत्र करुन या लोकसभा क्षेत्राच्या बाहेरील व्यक्तीला गडचिरोली - चिमुर लोकसभा क्षेत्राची उमेदवारी दिली'' असे सांगितले.

''घटनेच्या तरतुदीनुसार गडचिरोली-चिमुर लोकसभा क्षेत्राचे स्थानिक आदिवासींची लोकसंख्या गृहीत धरुन या भागातील प्रश्न व समस्या लोकसभेत मांडून सोडविले जातील, हा उद्देश होता. अशी संकल्पना दृष्टीस ठेऊन गडचिरोली - चिमूर लोकसभा क्षेत्र आदिवासीसाठी आरक्षित ठेवण्यात आलेला होता. या संकल्पनेला छेद देवून प्रदेश पातळीवरील नेत्यांनी आपसी गटबाजी आणि कुरघोडीच्या राजकारणात माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा बळी घेऊन गडचिरोली जिल्ह्याबाहेरील व्यक्तीला उमेदवारी दिल्याने स्थानिक नेतृत्वावर अन्याय झालेला आहे. माझ्या सारख्या पक्षासाठी रात्रंदिवस मेहनत करण्याऱ्या कार्यकर्त्याला काँग्रेसचे स्थानिक व राज्यपातळीवरील नेतृत्व गटबाजीने ग्रस्त असल्यामुळे न्याय देवू शकत नसेल, तर या क्षेत्रातील लोकांना न्याय कसा मिळेल? या बाबीचा विचार करुन महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे'', असदेखील त्यांनी दुपारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
Comments
Add Comment

Nashik Earthquake : नाशिकच्या सुरगाणा तालुक्यात पुन्हा भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

नाशिक : राज्यात उन्हाचा कडाका वाढत असताना नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात मात्र वेगळीच परिस्थिती निर्माण

पुणे आणि उर्वरित महाराष्ट्रासाठी तरतूद

पुणे : पुणे मेट्रोचा दुसरा टप्पा, खडकवासला-स्वारगेट-हडपसर-लोणी काळभोर मार्ग आणि पुणे ते शिरूर ५३ किमीचा उन्नत

Buldhana News: आईला कॉल करत संपवलं आयुष्य; नेमकं घडलं काय?

बुलढाणा: आईला शेवटचा कॉल करुन तरुणाने आपली जीवनयात्रा संपवल्याची बातमी समोर येत आहे. ही काळीज पिळवटून टाकणारी

‘शाळा बंद’ धोरणाविरुद्ध उच्च न्यायालयात आव्हान

हायकोर्टाने बजावली शिक्षण विभागास नोटीस अमरावती : बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९

Iran Israel Conflict Affect In India: इराण आणि अमेरिका-इस्त्रायल युद्धाचा परिणाम महाराष्ट्रापर्यंत पोहोचला, नेमकं काय झालं?

दिल्ली: अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाचा आज सातवा दिवस आहे. दोन्ही बाजूंनी हल्ले सुरू असून सध्या

नागझिरा अभयारण्यात ‘चष्मेवाला’ पक्ष्याचे दर्शन

अमरावती : विदर्भातील निसर्गसंपन्न नागझिरा अभयारण्याच्या पिटेझरी येथील डॉ. वांगारी मुटा माथाई रोपवाटिकेत