हैदराबाद : वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी पदाचा गैरवापर करून फोन टॅपने संगणक प्रणाली आणि अधिकृत डेटा नष्ट केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. हैदराबाद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अतिरिक्त डीसीपी थिरूपथण्णा आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक एन. भूजंगा राव असे आरोपींचे नाव असून त्यांनी पदाचा गैरवापर करत खासगी व्यक्तींवर बेकायदा नजर ठेवल्या प्रकरणी अटक केले आहे.
यापूर्वी दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांनी विशेष गुप्तचर विभाग (एसआयबी) आणि गुप्तचर विभागात अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून काम केले होते. त्यांच्यावर निलंबीत डीएसपी डी. प्रणीत राव यांच्याशी हातमिळवणी केल्याचा आरोप होता. राव यांना गुप्तचर माहिती खोडल्याचा आणि फोन टॅपिंग केल्याबद्दल अटक केली होती. चौकशीदरम्यान, दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांनी गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याचे कबुल केले आहे.