मदालसा ही दिग्गज अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांची सून आहे. अनुपमा मालिकेत काव्याची भूमिका साकारणारी मदालसा शर्मा सध्या एका धक्कादायक खुलासा केल्यामूळे चर्चेत आहे . करिअरच्या सुरुवातीला तिला एका दिग्दर्शकाने ऑफ कॅमेरा मिटींग मध्ये बिकिनी घालून येण्यासाठी सांगितले. त्यावेळी मदलासाने न डगमगता दिग्दर्शकाला सडेतोड उत्तर दिले आणि तिथून निघून गेली.
नेमकं काय म्हणाली मदालसा ?
द मेल फेमिनिस्ट या पॉडकास्टमध्ये संवाद साधताना तिने हे सर्व प्रकरण सांगितले. ती म्हणाली मी तेव्हा १९ वर्षाची होते, पण मला परिस्थिती समजत होती. एका प्रसिद्ध दिग्दर्शकाने मला मिटिंगसाठी बोलवलं होत. त्यांना एका मुलीची गरज होती जी कॅमेऱ्यासमोर बिकिनी घालण्यात कम्फर्टेबल असेल.सुरूवातीला मला वाटलं की यात काय विशेष आहे. त्यानंतर तिने दिग्दर्शकाला विचारले, मिटिंगमध्ये येण्यासाठी बिकिनी घालण्याची अट का आहे ? असं विचारताच दिग्दर्शक म्हणाला की, मला हे पाहायचं आहे की तू बिकिनी घालू शकतेस का ? यावर मदालासा म्हणाली, मला माफ करा, मी अभिनेत्री आहे. जर एखाद्या सीनसाठी बिकिनीची गरज असेल किंवा साडी किंवा लेहेंगा असो,जे काही असेल ते मी कॅमेऱ्यासमोर घालण्यास तयार आहे आणि त्यात मी कम्फर्टेबल असेन, कारण तो माझ्या कामाचा भाग आहे. पण तुमच्यासमोर बिकिनी घालणं हा माझ्या कामाचा भाग नाही! त्यामुळे जर तुम्हाला माझ्या टॅलेंटवरून मला कास्ट करायचं असेल तर तुम्ही करू शकता, आणि जर का असे नसेल तर बाहेर जाण्याचा रस्ता मला माहित आहे... एवढे बोलून मदालासा तिथून निघून गेली.






