आयपीएलच्या १७व्या हंगामाला २२ मार्चपासून दणक्यात सुरुवात झाली. देशात लोकसभा निवडणुका होत असल्यामुळे आयपीएलच्या पहिल्या १७ दिवसांचे वेळापत्रक जाहीर केले होते. २१ सामन्यांचे ७ एप्रिलपर्यंतचे हे वेळापत्रक होते. निवडणुकांच्या तारखा स्पष्ट झाल्यानंतर उर्वरित सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले जाईल असे सांगण्यात आले होते. सोमवारी बीसीसीआयने उर्वरित वेळापत्रकाची घोषणा केली. त्यानुसार आयपीएलची यंदाच्या हंगामाची फायनल २६ मे रोजी चेन्नई येथे होणार आहे. लोकसभा निवडणुका १९ एप्रिल ते १ जून या कालावधीत होणार आहेत.
सोमवारी बीसीसीआयने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार ८ एप्रिल रोजी चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स या सामन्याने पुढच्या टप्प्याची सुरुवात होणार आहे. २६ मे २०२४ रोजी आयपीएलच्या १७व्या हंगामाची अंतिम लढत होणार आहे. हा सामना चेन्नईमध्ये खेळवला जाणार आहे. तब्बल १२ वर्षांनंतर आयपीएलची फायनल चेन्नईत होणार आहे.
क्वालिफायर १ आणि एलिमेटनर हे दोन सामने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर अनुक्रमे २१ मे आणि २२ मे रोजी होणार आहेत. तर क्वालिफायर दोन हा सामना २४ मे रोजी चेन्नईला होणार आहे.
माझे कोकण: संतोष वायंगणकर गरिबी आहे, घरची परिस्थिती नाही यामुळे पुढे शिक्षण घेता येत नाही…
वैशाली शिरोडकर: पहलगाम निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेला काश्मीरचा भाग दहशतीच्या सावटाखालीही फुलतो आहे. गेल्या चार-पाच…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण वरुथिनि एकादशी, शके १९४७. शततारका नक्षत्र. योग ब्रम्हा. चंद्र राशी…
भारताचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी दहशवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवर हल्ला करून २८ जणांची…
हैदराबाद: इंडियन प्रीमियर लीग २०२५मधील ४१व्या सामन्यात आज २३ एप्रिलला मुंबई इंडियन्स संघाने सनरायजर्स हैदराबादला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली…