महाराष्ट्रात रंगणार राजकीय धुळवड!

तीन-चार दिवसात जाहीर होणार जागावाटपासह उमेदवार


मुंबई : देशासहित राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. सर्व राजकीय पक्षांनी लोकसभा निवडणुकीसाठी जय्यत तयारी केली आहे. सध्या राजकीय पक्षांनी जागावाटपांसाठी बैठकांचा धडाका लावला आहे. मात्र, राज्यातील युती, आघाडीचा जागावाटपाचा तिढा कायम असून येत्या २-३ दिवसांत हा तिढा मिटण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पुढील २-३ दिवसांत ‘राजकीय धुळवड’ पाहायला मिळण्याची शक्यता आहे.


लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांच्या चार याद्या जाहीर केल्या आहेत. भाजपने राज्यातील २० उमेदवार जाहीर केले आहेत. दुसरीकडे काँग्रेसने आतापर्यंत उमेदवारांच्या ३ याद्या जाहीर केल्या आहेत. काँग्रेसने राज्यातील ७ उमेदवार जाहीर केले आहेत. त्यामुळे इतर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस, भाजपकडून कोणाला उमेदवारी मिळते, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती, महाविकास आघाडीच्या जागावाटपासाठी बैठका सुरु आहेत. तर महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडी सहभागी होईल का, हे देखील येत्या २-३ दिवसांत स्पष्ट होईल.


महाविकास आघाडीच्या जागावाटपात ठाकरे गटाला सर्वाधिक जागा मिळण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाला २२, काँग्रेसला १६ आणि राष्ट्रवादी काँग्रेस - शरदचंद्र पवार पक्षाला १० जागा सुटण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा ४ जागांवरून अडल्याचे सांगितले. जात आहे. येत्या दोन-तीन दिवसांत महाविकास आघाडीचा तिढा मिटण्याची शक्यता आहे.


महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला काय?


महायुतीच्या जागावाटपाचाही तिढा कायम आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप , शिंदे गट आणि अजित पवार गट अनुक्रमे ३१-१३-४ असा महायुतीचा फॉर्म्युला असण्याची शक्यता आहे. तर काही दिवसांपूर्वी राज ठाकरेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. त्यामुळे लवकरच महायुतीमध्ये मनसे देखील सहभागी होण्याची शक्यता आहे. या महायुतीच्या जागावाटपात मनसेला किती जागा मिळतील, हे देखील पहावे लागेल.


देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?


महायुतीच्या प्रमुख नेत्यांची जागावाटपासाठी दिल्लीत महत्वाची बैठक आहे. या बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे दिल्लीला पोहोचले आहेत. या बैठकीसाठी दिल्लीला पोहोचलेल्या देवेंद्र फडणवीसांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी महायुतीच्या जागावाटपावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘आमचं ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. २० टक्के काम लवकरच पूर्ण करू. बैठकीमध्ये याचा निर्णय होईल. तीन पक्षांचे अंतिम जागावाटप बाकी आहे. येत्या दोन दिवसांत जागावाटप होईल.'


श्रीकांत शिंदे काय म्हणाले?


महायुतीच्या जागावाटपाविषयी खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले, ‘महायुतीची जागा वाटप लवकरच होईल आणि उमेदवार देखील लवकरात लवकर जाहीर होईल’.


महाविकास आघाडीच्या जागावाटपावर नाना पटोले काय म्हणाले?


नाना पटोले म्हणाले, 'महाविकास आघाडीची जागावाटपावर चर्चा झाली आहे. वंचित बहुजन आघाडी, समाजवादी पक्ष, माकप या पक्षांशी बोलणी सुरु आहे. काँग्रेसचे उमेदवार जवळपास निश्चित झाले आहेत. सर्व मित्र पक्षांशी चर्चा करून महाविकास आघाडीचे जागावाटप आणि उमेदवार दोन-तीन दिवसांत जाहीर होतील, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.

Comments
Add Comment

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये

Satara Gazette: जरांगे पाटलांची ती मागणी सुद्धा होणार मान्य, मराठा समाजाला दिलासा!

सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात सरकारी हालचालींना सुरुवात  मुंबई: मराठा समाजाला आणखीन एक दिलासा देणारी बातमी

'आदिवासींच्या जीवनात ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल'

यवतमाळ : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या

साई मंदिरातील प्रसाद, दर्शन, सुरक्षा आता एआयच्या नियंत्रणात

स्मार्ट सुरक्षा प्रणालीमुळे अपप्रवृत्तीला बसणार आळा शिर्डी : श्री साईबाबा संस्थानात भाविकांच्या सुरक्षेसह

परतीचा पाऊस येत आहे रे.. सावधान!

महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा मुंबई: गणपती विसर्जनानंतर अनेक दिवस दडी मारून बसलेला

पुण्यातील दर्ग्याखाली बोगदा! हिंदू संघटनांनी केला मंदिर असल्याचा दावा

पुणे: पुण्यातील मंचर येथील दर्ग्याच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळली, त्याखाली मंदिरासारखी रचना आढळल्याने वाद