14 डिसेंबर 23 रोजी भारतीय नौदलाने माल्टा ध्वजांकित बल्क कॅरिअर ‘एमव्ही रुएन’ या जहाजेच्या अपहरणाविरोधी सक्रिय कारवाई सुरु केली होती. ‘ऑप संकल्प’ अंतर्गत सुरू असलेल्या या सागरी सुरक्षा ऑपरेशनला 100 दिवस पूर्ण झाले. या वेळी, भारतीय नौदलाने वेगवेगळ्या 18 घटनांना प्रतिसाद देत हिंदी महासागर क्षेत्रात ‘प्रथम प्रतिसादकर्ता’ आणि ‘प्राधान्य सुरक्षा भागीदार’ म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. एमव्ही रुएनच्या अपहरणाच्या विरोधात केलेल्या कारवाईने भारतीय नौदलाच्या योगदानाचे महत्त्व अधिकच अधोरेखित झाले. सीमाशुल्क आणि इमिग्रेशनच्या योग्य औपचारिकतेनंतर पकडण्यात आलेल्या 35 सोमालियन चाच्यांना मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
भारतीय नौदलाची धडाकेबाज कामगिरी! सोमालियन चाच्यांच्या तावडीतुन सोडवली व्यापारी जहाज…