Vasant More : 'मी अपक्ष उमेदवारीवर ठाम!' मविआत संधी न मिळाल्याने वसंत मोरेंचा निर्धार

पक्षातून बाहेर पडल्यावर जास्त त्रास झाला : वसंत मोरे


पुणे : मनसेचे (MNS) निष्ठावान कार्यकर्ते समजले जाणारे वसंत मोरे (Vasant More) यांनी काही दिवसांपूर्वी मनसेला जय महाराष्ट्र केला. त्यामुळे पुणे लोकसभा मतदारसंघ (Pune Loksabha constituency) चर्चेचा विषय ठरला होता. या मतदारसंघातून निवडणूक लढवावी अशी वसंत मोरेंची इच्छा होती. त्यांना पक्षातून त्रास झाल्याने त्यांनी मविआकडून उमेदवारी मिळतेय का यासाठी प्रयत्न केले. मात्र, मविआने पुण्यातून काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांना उमेदवारी जाहीर केली, तर दुसरीकडे महायुतीकडून भाजपाचे मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता वसंत मोरेंनी थेट अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.


गिरीश बापट (Girish Bapat) यांच्या निधनानंतर पुणे लोकसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली होती. मात्र, तिथे पोटनिवडणूक न घेतल्यामुळे आता पुण्यात नेमकं कोण निवडून येणार? यावर पुणेकरांमध्ये चर्चा पाहायला मिळत आहे. पुण्यातील मनसेच्या स्थानिक नेते व पदाधिकाऱ्यांकडून त्रास दिला जात असल्याचं सांगत वसंत मोरे यांनी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी मविआमधून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नही केले. मात्र, आता मविआकडून काँग्रेसच्या धंगेकरांना अधिकृतपणे उमेदवारी दिल्यामुळे वसंत मोरे यांनी अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचा मानस बोलून दाखवला.



पक्षातून बाहेर पडल्यावर जास्त त्रास झाला


“महाविकास आघाडीकडे मी उमेदवारी मागण्यासाठी गेलो नव्हतो. पुण्याची समीकरणं कशी जमू शकतात त्याचा तुम्ही विचार करा हे मी त्यांना सांगू इच्छित होतो. पण मला वाटतं की कदाचित मी थोड्या दिवसांत सांगेन की मनसेच्या पुण्यातल्या कोणत्या नेत्यांनी माझ्या वाटेत पुन्हा एकदा काटे टाकले. कुणी कुठे बैठका घेतल्या हे सांगेन. मला हे कळत नाही की पक्षात होतो तेव्हाही मला त्रास दिला गेला. पण आता पक्षातून बाहेर पडल्यानंतर उलट जास्त त्रास झाला”, असं वसंत मोरे म्हणाले आहेत.



आता मी काय करतो हे सर्व पक्षांना कळेल...


“मला वाटतं की मी बाहेर पडल्यामुळे बऱ्याच जणांच्या पायाखालची वाळू सरकली. त्यांना वाटलं की आता हा नक्की काय करतोय. जे कुणाला कधीच शक्य झालं नाही, ते शक्य करून दाखवतोय की काय. हा काय गणितं आखू शकतो? याची चिंता या लोकांना वाटायला लागली. त्यामुळे मी जी सांगड घालू पाहात होतो पुण्यात ती विस्कटली. पण मी विस्कटणार नाही. मी निवडणूक लढवण्यावर ठाम आहे. मी अपक्ष उमेदवारीवर ठाम आहे. आता मी कुणाकुणाला काय काय उपद्रव करतो हे पुणे शहरातल्या सर्व पक्षांना कळेल”, असा सूचक इशारा वसंत मोरे यांनी दिला आहे.



पुण्यात मीच पहिल्या क्रमांकावर


दरम्यान, पुणे लोकसभा निवडणुकीत आपणच पहिल्या क्रमांकावर राहणार असल्याचा दावा वसंत मोरे यांनी केला आहे. “मी पुण्यात पहिल्या क्रमांकावरच राहीन. पुणेकरांचा उमेदवार मीच असेन. पुणेकरांनी वर्षभरापूर्वी गिरीश बापट यांचं निधन झालं तेव्हाच हे ठरवलं आहे. आता मी पक्ष, संघटना या सगळ्या गोष्टींना तिलांजली दिली आहे. आता मी निवडणूक लढण्याच्या पूर्ण तयारीत आहे. आत्ता नाही, दोन वर्षांपासून माझी तयारी चालू आहे”, असं वसंत मोरे म्हणाले. त्यामुळे येत्या काळात पुणे लोकसभा मतदारसंघात आणखी काय काय पाहायला मिळणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Comments
Add Comment

शिवजन्मभूमीचा विकास करणे आमचे भाग्य

जुन्नरला देशातील क्रमांक-१ पर्यटन तालुका करणार एमआयडीसी, आयटी पार्क चांगले रस्ते तयार करून जुन्नरचा कायापालट

नाशिकच्या ६२२ ग्रामपंचायतींमध्ये ‘प्रशासक राज’

नाशिक : यंदा मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील ६२२ ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त करण्यात येणार आहे. सार्वत्रिक

Nitesh Rane: आम्ही विरोधकांना दुर्बीण घेऊन शोधत...; नितेश राणेंचा विरोधकांवर हल्लाबोल

सिंधुदुर्ग: राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत सिमितीच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. याच निवडणुकीच्या

मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर आणखी एक अपघात, वाहतुकीची कोंडीच कोंडी

पुणे : मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर खंडाळा घाटातील आडोशी बोगद्याजवळ पुण्याकडून मुंबईच्या दिशेने प्रोपिलीन वायू

आपत्कालीन परिस्थितीतील वाहतूक आराखडा तत्काळ तयार करा - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग वाहतूक कोंडीची उपमुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल मिसिंग लिंकचे कामही लवकरात लवकर

अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी १२ हेक्टर जागा मंजूर

देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय १०० विद्यार्थी प्रवेश ⁠४३०