Arvind Kejriwal: अरविंद केजरीवाल यांना EDने केली अटक

नवी दिल्ली: दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल(arvind kejriwal) यांना केंद्रीय तपास विभाग ईडीने दारू घोटाळा प्रकरणात अटक केली आहे. ईडीने केजरीवाल यांची तब्बल दोन तास चौकशी केली आणि यानंतर त्यांची टीम त्यांना घेऊन ईडी कार्यालयात पोहोचली.


स्वतंत्र भारताच्या इतिहासात हे पहिले प्रकरण आहे जेव्हा मुख्यमंत्री असताना एखाद्या नेत्याला केंद्रीय तपास विभागाने अटक केली आहे.


आपने स्पष्ट केले की अटकेनंतरही केजरीवाल आपल्या पदाचा राजीनामा देणार नाहीत. सोबतच पक्षानेही या अटकेविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आपने म्हटले की निवडणुकीमुळे ही अटक झाली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाचा झटका बसल्यानंतर ईडीची टीम गुरूवारी संध्याकाळी सात वाजता केजरीवाल यांच्या निवासस्थानी पोहोचली. या दरम्यान कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती.



राजीनामा देणार नाहीत केजरीवाल


अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर आम आदमी पक्षाने स्पष्ट केले की केजरीवाल मुख्यमंत्रीपदावर कायम राहतील.मंत्री आतिशी म्हणाल्या की केजरीवाल मुख्यमंत्री होते, आहेत आणि राहतील. त्यांनी सांगितले की अरविंद केजरीवाल एक विचार आहे त्यांना संपवले जाऊ शकत नाही.


या प्रकरणात ईडीची ही चौथी मोठी कारवाई आहे. अरविंद केजरीवाल यांच्या आधी ईडीने दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि संजय सिंह यांना अटक केली आहे. नुकत्याच ईडीच्या टीमने या संबंधित प्रकरणात बीआरएसचे नेता कविता यांना अटक केली होती.

Comments
Add Comment

Bolivia Plane Crash : बोलीवियात नोटांनी भरलेलं विमान थेट रस्त्यावर कोसळलं; १५ जणांचा जागीच मृत्यू, दुर्घटनेनंतर रस्त्यावर विखुरला पैशांचा खच!

दक्षिण अमेरिकेतील बोलीविया देशातून शुक्रवारी (२७ फेब्रुवारी) एक अतिशय भीषण बातमी समोर आली. राजधानी ला पाझजवळील

प्रदूषणाच्या विळख्यात जीवनवाहिन्या?

४६ % नद्यांसोबतच गंगा-यमुनाही दूषित नवी दिल्ली : कोट्यवधी भारतीयांची जीवनवाहिनी आणि श्रद्धेचे प्रतीक असलेल्या

भारत-पाक सीमेवर 'प्रचंड' हेलिकॉप्टरमध्ये सह-वैमानिक म्हणून राष्ट्रपती मुर्मू यांनी रचला इतिहास

जयपूर : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शुक्रवारी राजस्थान मधील जैसलमेर येथे स्वदेशी हलक्या लढाऊ हेलिकॉप्टर

RTO Rules Upadate : चालकांसाठी आरटीओचे 'हे' नवीन नियम; नितीन गडकरी यांची घोषणा

नवी दिल्ली : देशात रस्ते अपघातांचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत आहे. गाड्यांच्या धडकेत निष्पाप नागरिक प्राण गमावत

Amit Shah : सीमांचलमधून घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी लवकरच विशेष मोहिम - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

सीमांचल भागातून घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी लवकरच विशेष मोहिम सुरू केली जाईल, असे विधान करत केंद्रीय

शनिवारपासून सलग पाच दिवस बँका राहणार बंद

मुंबई: तुम्ही जर बँकेत जाऊन काही काम करायचा विचार करत असाल किंवा लोन किंवा इतर काही कामं तुमची राहिली असतील तर