Thursday, July 18, 2024
Homeताज्या घडामोडीविकी कौशल नव्हे तर शाहिद कपूर साकारणार 'अश्वत्थामा'ची भूमिका

विकी कौशल नव्हे तर शाहिद कपूर साकारणार ‘अश्वत्थामा’ची भूमिका

मुंबई: शाहिद कपूर(shahid kapoor) आपल्या नव्या सिनेमाच्या घोषणेनंतर चर्चेत आला आहे. अॅमेझॉन प्राईम व्हिडिओ इंडियाने १९ मार्चला #AreYouReady इव्हेंटचे आयोजन केले होते. या इव्हेंटदरम्यान ‘अश्वत्थामा: द सागा कंटिन्यूज’ची घोषणा करण्यात आली.सिनेमा थिएटरमध्ये रिलीज झाल्यानंतर प्राईम व्हिडिओवर स्ट्रीम होईल. या सिनेमाचा हिरो शाहिद कपूर असणार आहे. पहिल्यांदा शाहिद कपूर एखाद्या पौराणिक सिनेमात काम करणार आहे.

शाहिद बनणार अश्वत्थामा

काही दिवसांपूर्वी बातमी आली होती की शाहिद कपूरने आपल्या पुढील सिनेमासाठी निर्माते वाशू भगनानीसोबत हात मिळवले आहेत. हे पहिल्यांदा होणार की शाहिद एखाद्या पौराणिक सिनेमात दिसेल. आता प्राईम व्हिडिओच्या इव्हेंटमधून या बातमीला दुजोरा मिळाला आहे. या सिनेमाचे नाव अश्वत्थामा द सांगा कंटिन्यूज असणार आहे. पुजा एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली बनवण्यात आले आहे. यात शाहिद कपूर महाभारतातील अमर योद्धा अश्वत्थामाच्या भूमिकेत दिसणार आहे.

विकी कौशल असणार होता हिरो

‘अश्वत्थामा: द सागा कंटिन्यूज’ हा सिनेमा गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत होता. हा सिनेमा उरी द सर्जिकल स्ट्राईकचे दिग्दर्शक आदित्य धर बनवणार होते. या सिनेमात हिरोही विक्की कौशल असणार होता. याचे एक पोस्टरही रिलीज करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी आर्टिकल ३७०च्या ट्रेलर लाँच दरम्यान आदित्य धरने घोषणा केली होती की ते आता हा सिनेमा बनवत नव्हते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -