Raj Thackeray : मला 'या' असा निरोप आला होता... दिल्लीवारीवर काय म्हणाले राज ठाकरे?

महायुतीत सामील होणार का? स्पष्टच सांगितलं...


नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) महायुतीत (Mahayuti) सामील होण्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. त्यातच राज ठाकरेंच्या भाजपच्या मुख्य नेत्यांशी होत असलेल्या सततच्या भेटीगाठींमुळे या चर्चांना आणखी उधाण आलं आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) तारखा जाहीर झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात होणारी ही एक मोठी उलथापालथ ठरु शकते. दरम्यान, काल राज ठाकरे अचानक चार्टर्ड विमानाने दिल्लीसाठी रवाना झाल्याने महायुतीला नवा भिडू मिळणार का याची चर्चा रंगली आहे.


दिल्लीमध्ये भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीसाठी महाराष्ट्रातील भाजपचे दिग्गज नेते दिल्लीत पोहोचले होते. त्यातच मनसे पक्षप्रमुख राज ठाकरेही दिल्लीत दाखल झाल्याने लवकरच भाजप-मनसे युतीचा मार्ग मोकळा होईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. राज ठाकरेंनी दिल्ली दरबारी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत चर्चा केली. मात्र नेमकी काय चर्चा करण्यात आली हे अद्याप कळू शकलेलं नाही.


दरम्यान, राज ठाकरे यांनी आपल्या दिल्लीवारीवर प्रतिक्रिया दिली आहे. 'मला या असा निरोप होता. मला काहीच माहित नाही. मी फक्त भेटायला आलो आहे', अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली आहे. त्यामुळे राज ठाकरे बैठकीनंतर काय निर्णय घेणार याकडे आता सर्वाचं लक्ष लागलं आहे. मनसे महायुतीत सामील होणार का, यावर मात्र अद्याप कोणत्याही नेत्याकडून अधिकृतपणे भाष्य करण्यात आलेलं नाही.


Comments
Add Comment

Papa Rao Killed in Encounter : नक्षलवाद्यांचा अजून ईक्का ठार..पोलीसांची मोठी कारवाई.

छत्तीसगड: छत्तीसगडमधील नक्षलविरोधी मोहिमेत सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे व तेथील नागरिकांना ही दिलासा

भारतीय सेनेच्या ताफ्यात कामिकाझे ड्रोन

नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूरनंतर भारतीय सेना आपल्या लढाऊ क्षमतेत सातत्याने वाढ करत असून, त्याचाच भाग म्हणून सेनेने

प्रजासत्ताक दिनासाठी सुरक्षा यंत्रणा सज्ज

दहशतवादी हल्ल्याचे सावट नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर गुप्तचर यंत्रणांनी देशभरातील सुरक्षा

दिल्लीसह अनेक राज्यांत थंडीचा कहर

अनेक भागांत पावसाची शक्यता नई दिल्ली : दिल्ली-एनसीआरसह उत्तर भारतातील अनेक भागांमध्ये कडक थंडी आणि धुक्याचा

भारत ब्रिक्स २०२६ अध्यक्षपदासाठी सज्ज

नवी दिल्ली : जागतिक राजकारणात भारताचे वजन सातत्याने वाढत असून, २०२६ मध्ये भारत ‘ब्रिक्स’ या समूहाचे अध्यक्षपद

अमेरिकन डाळींवर ३०% टॅरिफ; अमेरिकन शेतकरी अस्वस्थ

ट्रम्प यांना अमेरिकी सिनेटरांचे पत्र नवी दिल्ली : अमेरिकेने भारतावर जड टॅरिफ लादले असले तरी भारतानेही अमेरिकन