Thursday, June 12, 2025

WPL 2024: चॅम्पियन बनलेल्या RCBवर पैशांचा पाऊस, पराभवानंतरही दिल्लीचा संघ बनला करोडपती

WPL 2024: चॅम्पियन बनलेल्या RCBवर पैशांचा पाऊस, पराभवानंतरही दिल्लीचा संघ बनला करोडपती

मुंबई: वुमन्स प्रीमियर लीग २०२४चा(womens premier league 2024) खिताब रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने(royal challengers bangalore) आपल्या नावे केला. आरसीबीने फायनलमध्ये दिल्ली कॅपिटल्सला हरवत खिताब जिंकला. बंगळुरूसाठी फायनलचा सामना खूपच सोपा ठरला. कारण त्यांनी पहिल्यांदा फलंदाजीसाठी उतरलेल्या दिल्लीच्या संघाला अवघ्या ११३ धावांत गुंडाळले होते. जाणून घेऊया की चॅम्पियन बनलेल्या आरसीबीला किती बक्षीस मिळाले. तसेच पराभवानंतरही दिल्ली कॅपिटल्सचा संघ कसा करोडपती बनला.


भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने वुमन्स प्रीमियर लीगच्या पहिल्या हंगामात चॅम्पियन बनणाऱ्या संघाला ६ कोटी रूपये आणि उपविजेता संघाला ३ कोटी रूपयांच्या बक्षिसाची घोषणा केली होती. दुसऱ्या हंगामात म्हणजेच २०२४मध्ये या बक्षिसाच्या रकमेत कोणताही बदल करण्यात आला नव्हता.


अशातच चॅम्पियन बनले्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला बक्षिसाच्या रूपात ६ कोटी रूपये मिळाले आणि उपविजेता राहणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सला ३ कोटी रूपयांचे बक्षीस मिळाले. पहिल्या हंगामात खिताब जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्स संघालाही ६ कोटी रूपये मिळाले होते. पहिल्या हंगामाप्रमाणेच दुसऱ्यांदाही दिल्लीचा संघ उपविजेता राहिला. दोन्ही हंगामात दिल्ली खिताबापासून एक पाऊल दूरच राहिली.



पुरुषांना जे जमले नाही ते महिलांनी करून दाखवले


इंडियन प्रीमियर लीगच्या आतापर्यंत १६ हंगामात आरसीबीला एकदाही खिताब जिंकण्यात यश आलेले नाही. अशातच दुसऱ्याच हंगामात वुमन्स प्रीमियर लीगमध्ये मात्र रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला खिताब जिंकता आला.

Comments
Add Comment