साकूर : संगमनेर तालुक्यातील साकूर परिसरात गुन्हेगारी कमी होण्याचे नाव घेईना. अपहरण, जीवे मारण्याचा प्रयत्न, जीवघेणा हल्ला, विनयभंग, बलात्कार, आर्म ऍक्ट सारखे गंभीर गुन्हे वारंवार घडत आहेत. त्यातच अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात वाढले आहे.
काही दिवसांपूर्वी साकूर गावात एक अल्पवयीन शाळकरी मुलगी अशीच एका अत्याचाराची बळी पडली आहे. साकूर गावातील एका इमारतीच्या रुबाब पान शॉपच्या गाळ्यात एक दहावीत शिकत असलेल्या मुलीवर हातपाय बांधून अमानवी अत्याचार केल्याची घटना घडली. या अत्याचार प्रकरणी घारगांव पोलीस ठाण्यात पिडित मुलीच्या आईने पाच जणांवर बलात्कारासह पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
सविस्तर वृत्त असे की, एक शाळकरी मुलगी दहावीच्या परिक्षेची हॉल तिकिट घेण्यासाठी आली असता पाच तरुणांनी मिळून या मुलीला आपल्या पान शॉप वर बोलावून दुकानाचे शटर ओढून घेत तिच्या तोंडात रुमाल कोंबून हात पाय बांधून जबरदस्तीने शारिरिक संबंध प्रस्थापित केले. तसेच तिच्या अज्ञानपणाचा फायदा घेत वेळोवेळी निर्दयीपणे बलात्कार केला. प्रत्यक्षदर्शींला जीवे मारण्याची धमकी देत त्याला तेथून हुसकावून लावले. यानंतर ही मुलगी घरी गेल्यानंतर घडल्या प्रकाराने बेइज्जत होत विषारी औषध प्राशन करून जीवन संपवले. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी मृत अत्याचार पिडित अल्पवयीन मुलीच्या आईने घारगाव पोलीस ठाण्यात सौरभ खेमनर, योगेश रामा खेमनर, प्रशांत भास्कर भडांगे, विकास रामदास गुंड, विजय खेमनर यांचे विरोधात बलात्कारासह पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अत्याचार पिडित अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने अक्षरशः हात पाय बांधून निर्दयीपणे अत्याचार केला. सदर घटनेने इज्जत गेली म्हणून पिडित मुलीने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. या आरोपींना घारगाव पोलीसांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तात्काळ अटक केली आहे. या घटनेने राज्यभर खळबळ उडाली आहे. सदर आरोपींना कडक शासन व्हावे, अशी मागणी जनतेतून होत आहे
विधानपरिषदेच्या उपसभापती निलमताई गोऱ्हे यांना ही बातमी समजताच संगमनेर डीवायएसपी सोमनाथ वाकचौरे यांना तपासाबाबत कठोर कारवाईच्या सुचना दिल्याची माहिती त्यांनी स्वतः एक्स ट्विटरवर दिली आहे.
नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये अतिरेक्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू…
मुंबईत महिलेसोबत नेमकं काय घडले? मुंबई : राज्यभरात दिवसेंदिवस अपघात, बलात्कार, आत्महत्या, मर्डर अशा अनेक…
जम्मू : जम्मू-काश्मीरमधील पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या पहलगाममध्ये मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) संपूर्ण…
मुंबई: पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. याच पार्श्वभूमीवर, पाकिस्तानी…
नवी दिल्ली: बुधवारी एअर इंडिया (Air India) आणि इंडिगोसह भारतीय विमान कंपन्या श्रीनगर ते दिल्ली…
श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे सात अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. ही…